हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका शकिरा ही अधिक प्रसिद्ध आहे. आजवर तिने अनेक गाणी गायली आहेत. तिच्या गाण्यांना जगभरात खूप पसंती मिळते. जगभरात तिचे अनेक कॉन्सर्टदेखील होत असतात. याबद्दलच तिची एक अपडेट समोर आली आहे. मियामी येथे एका लाईव्ह शोदरम्यान तिच्याबरोबर एक असा प्रसंग घडला ज्यामुळे ती अधिक नाराज झाली आणि शो चालू असतानाच ती स्टेजवरुन खाली उतरली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला ज्यामुळे शकिराचे चाहतेदेखील मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. (shakira viral video)
एका शोदरम्यानचा शकिराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये शकिरा गाणं म्हणत डान्स करतानादेखील दिसत आहे. त्याचवेळी तिला ड्रेसच्या खालून कोणीतरी व्हिडीओ बनवत असल्याची तिला जाणीव झाली. त्यावेळी ती नकार देते आणि ड्रेसदेखील व्यवस्थित करताना दिसते. नंतर ती हसून पुन्हा एकदा डान्स करण्यास सुरुवात करते. पण ती व्यक्ती पुन्हा तसंच कते. हे बघून शकिराला राग येतो आणि ती स्टेजवरुन खाली उतरते.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिचे चाहते तसेच नेटकरी तिला पाठिंबा देत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “हे वागणं खरच खूप चुकीचं आहे. कलाकारांना स्टेज व स्टेजच्या बाहेरदेखील प्रायव्हसी मिळाली पाहिजे. सगळ्यांसाठी सुरक्षित वातावरण असणे गरजेचे आहे”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “त्या व्यक्तीला अटक करा”, तसेच अजून एकाने लिहिले की, शकिराला तिथून जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणालाही असा अपमान सहन करायला लागू नये”.
शकिराने अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काही महिन्यांपूर्वी ती ब्रेकअपमुळे खूप चर्चेत होती. गेरार्ड पिकबरोबर ती रिलेशनशिपमध्ये होती. दोघंही ११ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांची दोन मुलंदेखील आहेत. मात्र त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि २०२२ साली त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.