Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा खेळ आता सुरू दणक्यात सुरु झाला आहे. पहिल्या काही दिवसांत घरातील स्पर्धक छान मिळून मिसळून राहिल्यानंतर काही दिवसांनी घरचं वातावरणच बदललं आहे. त्यामुळे घरात दोन गट झाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर कव पॅडी कांबळे यांचा एक ग्रुप आहे. तर दुसरीकडे निक्की तांबोळी, अरबाज पटेल, घन:श्याम दरवडे, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण यांचा एक ग्रुप आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही ग्रुपमध्ये वादावादी झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाऊच्या धक्क्यावर निक्कीला तिच्याच टीमने केलेली चुगली ऐकवल्यानंतर या टीममध्ये फुट पडली आहे. अशातच निक्की व अभिजीत यांची मैत्री झाली आहे. (Bigg Boss Marathi 5 Dhananjay Powar)
या घरातील डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवार त्याच्या खास अंदाजाने सर्वांची मनं जिंकत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या कोल्हापूरी अंदाजानं धनंजय पोवार यांनी नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. याच जोरावर त्यांची ‘बिग बॉस मराठी’साठी निवड झाली आहे. घरात तणावाचं वातावरण असलं तर डीपी दादा त्यांच्या विनोदी शैलीने ते वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांचा हाच स्वभाव घरातील काही सदस्यांना आवडत नाहीये आणि याबद्दल डीपी दादांना खंत वाटत आहे. ही खंत त्यांनी अंकिता जवळ बोलून दाखवली आहे. नुकत्याच झालेल्या एका भागात डीपी दादांनी त्यांना त्यांना मिळणाऱ्या या वागणुकीबद्दल अंकिताशी संवाद साधला आहे.
या संवादात डीपी दादांनी अंकिताला असं म्हटलं की, “माझ्याकडे एखाद्याला हसवण्याची जी कला आहे. जोक करुन एकमेकांचे बिघडलेले संबंध जुळवणे हे घरात काहींना आवडत नाहीये. माझ्या कोणत्याच जोकवर हे (वर्षा, पॅडी व अभिजीत) लोक हसत नाहीयेत. हे मला जाणवत आहे आणि त्यांना ते खुपत आहे. हीच गोष्ट मी जान्हवीलाही सांगितली. अभिजीत व वर्षाताई तर नाहीच पण पॅडीदादांचं अजून नीट कळत नाहीये. माझ्याबद्दल ते अजूनही साशंक आहेत. अभिजीत व वर्षा यांना मी आपल्या ग्रुपमध्ये खटकत आहे आणि हे सत्य आहे”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “माझ्यामुळे हिची फाटली”, निक्कीने अंकिताची नक्कल करत तिला डिवचलं, अभिजीतजवळ चुगली अन्…
ते मला बोलू शकतं नाहीत किंवा मला आपल्या ग्रुपपासून तोडूही शकत नाहीत. हे त्यांनाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. मला त्यांचं मतपरिवर्तन करायचं नाही आणि ते होणारही नाही. माझ्या कानावर आलं आहे की, माझी कॉमेडी किंवा माझे बोलणं काही लोकांना आवडत नाही हे मला सांगा. मी नाही करणार तसं हवं तर… तर ती म्हणाली, तुमच्यामुळे तरी आम्ही दोनवेळा हसत आहोत. नाहीतर सगळेच मेलेलं तोंड करुन बसलेले असतात”.
यावर अंकिता त्यांना असं म्हणते की, “तुम्ही जसे आहात तसंच या घरात वागत आहात तर तुम्हाला हे कुणी सांगण्याची काय गरज आहे? तुमची कॉमेडी इतरांना आवडत नाही. तर ज्याला आवडत नाही तर इतरांबद्दल बोलण्यासाठी त्याची गरज नाही. तुम्ही त्याचं आणि तुमचं बघा. त्यांना तुम्ही सांगा की, तुला आवडत नसेल तर मी तुझी मस्करी नाही करणार” यावर धनंजय पोवारही असं म्हणतात की, “त्यामुळेच मी आता हे सगळं थांबवलच आहे”.