प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या गायक जोडीने वेळोवेळी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यांचे युट्यूब आणि इन्स्टाग्रामवरील गायनाचे व्हिडिओ अनेकदा चर्चेत येतात आणि व्हायरलही होतात. काही महिन्यांपूर्वी या जोडीने ‘आमचं ठरलंय’ म्हणत त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले होते. दरम्यान आतापर्यंत त्यांच्या प्रत्येक फोटो व व्हिडीओवर चाहत्यांनी नेहमीच कौतुकाच्या कमेंट केल्या होत्या. लिटिल चॅम्पपासून प्रथमेश-मुग्धा चाहत्यांचे आवडते असल्याने त्यांचे नेहमीच कौतुक होत आले आहे. अशातच नुकत्याच झालेल्या श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त त्यांनी गायनाचा कार्यक्रम केला आणि यावेळी त्यांनी गायलेलं गाणं ऐकून उपस्थितांनी त्यांचे खूपच कौतुक केलं.
प्रथमेषने याच कार्यक्रमातील त्याच्या गायनाचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात सर्व रसिक श्रोते त्याच्या गायकीमुळे भारावून गेले आहेत आणि भारवलेल्या प्रेक्षकांसाठी प्रथमेशने एक खास व्हिडीओ शेअर करत त्याच्या आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत. प्रथमेशने त्याच्या गायनाचा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात ‘देवाचा देव बाई ठकडा’ ही संत एकनाथ महाराजांची गवळण गायलो. या रचनेला रसिक मायबाप प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आम्ही कलाकार मंडळी आणि रसिक मायबाप यांनी मिळून केलेला सांगीतिक गोपाळकाला आपल्याबरोबर शेअर करण्यासाठी गोपाळ काल्यासारखा दुसरा पवित्र दिवस असूच शकत नाही”.
आणखी वाचा – Bigg Boss च्या घरात डीपी पडला एकटा, ग्रुपमधील सदस्यांनाही धनंजय नकोसा, अंकिताला म्हणाला, “मला जाणवतं की…”
प्रथमेशचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या व्हिडीओला त्याच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. तसंच या व्हिडीओखाली प्रथमेशच्या काही सहगायकांनीही कमेंट्स करत त्याचं कौतुक केलं आहे. रोहित राऊत, शमिका भिडे व मुग्धा वैशंपायनदेखील कमेंट्स करत त्याचे कौतुक केलं आहे. “वा बुवा, खूप छान, किती सुंदर” अशा अनेक कमेंट्स करत प्रथमेशच्या गायनाचे कौतूक केलं आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “माझ्यामुळे हिची फाटली”, निक्कीने अंकिताची नक्कल करत तिला डिवचलं, अभिजीतजवळ चुगली अन्…
दरम्यान, आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकणारी, सध्याची मराठी संगीतविश्वातील लाडकी जोडी म्हणून मुग्धा व प्रथमेश हे लोकप्रिय आहेत. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून घराघरात पोहोचलेले मुग्धा व प्रथमेशने गेल्या वर्षी २१ डिसेंबरला लग्न केलं. मराठी रिती-रिवाजानुसार पारंपरिक पद्धतीत दोघांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. त्यांच्या गाण्याचं नेहमीच कौतुक होत असतं.