Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. ‘बिग बॉस’च्या घरात काय घडतं, काय बिघडतं हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील हा चौथा आठवडा वादाचा ठरत आहे. कारण ‘टीम ए’मध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. निक्की तांबोळी आणि तिच्या ‘टीम ए’मधील सदस्यांची जोरदार भांडणं झाली आहेत. या घरात निक्की व वाद हे समीकरण काही नवीन राहिलेलं नाही. या घरातील भांडणासाठी निक्कीचे नाव कायमच अग्रेसर आसल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे. या घरात वर्षा, जान्हवी, घन:श्यामनंतर आता अंकिताबरोबर तिचे चांगलेच वाजले आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
अंकिताचे नाव नॉमिनेशन टास्कमध्ये असल्याने तिला आता भीती वाटत आहे असं म्हणत निक्कीने अंकिताशी वाद घातला आहे. या नवीन प्रोमोमध्ये निक्की अंकिताविषयी बोलताना असं म्हणते की, “काल अंकिता किती घाबरली होती ते दिसलं. धनंजय सरांना सारखी बोलत होती की मी नॉमिनेटेड आहे आणि पुन्हा बोलते की मला नॉमिनेशनची भीती नाही वाटत. ती इतकी फटिचर आहे ना? बिग बॉस ते लोक नॉमिनेट झाल्यावर मी एक वेगळंच रुप बघितलं”.
पुढे निक्की अंकिताची नक्कल करत असं म्हणते की, “काल मी त्यांच्या मागे बसली होती. तेव्हा पाहिलं की, ती धनंजय सरांना बोलत होती की, मी एवढंच सांगते मी नॉमिनेटेड आहे. मी एवढंच सांगते मी नॉमिनेटेड आहे. कारण मी आहे ना उभी म्हणून ही घाबरली आहे. नॉमिनेशनमध्ये मी आणि अभिजीत आहे त्यामुळे तिला माझी भीती वाटत आहे”. पुढे तिचं बोलणं ऐकून अंकिता तिच्या जवळ येत तिला “तू माझ्याबद्दल बोलत आहेस का?” असं विचारते. यावर निक्कीही “हो! ये इथे माझ्यासमोर उभी रहा” असं म्हणते. तेव्हा अंकिताही तिला “जे काय आहे ते थेट बोलना” असं म्हणते.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “माझ्यामुळे हिची फाटली”, निक्कीने अंकिताची नक्कल करत तिला डिवचलं, अभिजीतजवळ चुगली अन्…
त्यामुळे आता अंकिता व निक्की यांच्यातलं हे भांडण आणखी किती टोकाला जाणार? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेत अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी व अभिजीत सावंत हे चार स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.