शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “रात्री असं अंथरुणात जाणं…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा जान्हवी किल्लेकरच्या वागणूकीवर संताप, अभिजीतच्या अंगावरही चढले अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 6, 2024 | 12:49 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
biggg boss season 5 mira jagannath angry

'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वातील स्पर्धकांचा वाद पाहता भडकली मीरा जगन्नाथ

Bigg Boss Marathi 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ सुरु झाल्यापासून अल्पावधीतच या शोने हवा केली आहे. यंदाच्या या नव्या पर्वात अगदी पहिल्याच आठवड्यात दोन गट झाले असून स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. यंदाच्या या नव्या पर्वात निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल हे स्पर्धक एका गटात तर अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, आर्या ही मंडळी एका गटात असून खेळ खेळताना दिसत आहेत.

पहिल्या आठवड्यात या स्पर्धकांनी कॅप्टन्सी टास्क गमावला. मात्र या आठवड्यात दोन्ही गटात कॅप्टन्सी टास्कवरुन चांगलीच लढत पाहायला मिळाली. दरम्यान या करन्सी टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये राडा पाहायला मिळाला. घरातील स्पर्धकांमध्ये currency वरुन जोरदार वाद होतात आणि या वादामध्ये सर्वांचाच पारा चढतो. या टास्कमध्ये जान्हवी व निक्की अंकिता वालावलकरच्या बेडवर चढून तिची चादर ओढत तिलाही ओढताना दिसत आहेत. हे चित्र पाहून अनेकांनी जान्हवी व निक्कीला चांगलेच सुनावले आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “बुक्कीतच मुंडी छाटेन” वैभवने सूरज चव्हाणला डिवचलं, तोही भडकला, म्हणाला, “हात लावून तर बघ”

घरातील हे भांडण पाहून प्रेक्षकवर्ग व ‘बिग बॉस’चे आधीचे सदस्य यावर मत मांडताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’च्या आधीच्या सीझनमध्ये अभिनेत्री मीरा जगन्नाथ पाहायला मिळाली. आता मीराने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत सदस्यांना चांगलाच टोला लगावला आहे. मीराने ‘बिग बॉस’च्या घरातील फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “रात्री कोणाच्या ही अंथरुणात जाणं खूप चुकीचं आहे आणि ही जान्हवी”, असं म्हणत तिने अंकिताच्या बेडवर चढून भांडतानाचा फोटो पोस्ट केला आहे.

आणखी वाचा – Tharal Tar Mag Serial : डीएनए टेस्टचं सत्य येणार समोर, तन्वीचा होणार पर्दाफाश, गैरसमजामुळे अर्जुन-सायलीमध्येही कडाक्याचं भांडण अन्…

तर ही पोस्ट तिने अरबाज, निक्की, वैभव, जान्हवी यांना टॅग करुन त्यांच्यावर राग व्यक्त केला आहे. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक सीझनने आजवर धुमाकूळ घातला आहे. आणि आता हा पाचवा सीझनही धुमाकूळ घालायला सज्ज होणार आहे. आता या आठवड्यात कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन हा टास्क रंगला ससून या आठवड्यात कॅप्टन कोण होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: bigg boss marathiBigg Boss Marathi 5 Updatesmira jagannath angry
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Aishwarya Narkar is stuck in the traffic on Thane Ghodbunder Road shared video on Instagram know more

ठाणे-घोडबंदर रोडवरील ट्राफिकमुळे ऐश्वर्या नारकर त्रस्त, बराच वेळ एकाच जागी, म्हणाल्या, "पैसा, वेळ, शक्ती सगळंच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.