Bigg Boss 17 Latest News : टेलिव्हिजनवर सध्या ‘बिग बॉस १७’ या रिऍलिटी शोची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यंदाच्या या पर्वाने हा रिऍलिटी शो बऱ्यापैकी रंगीतदार झाला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यंदाच्या पर्वात आपल्याला हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. तर स्पर्धकांमधील वाद या शोमध्ये अधिक प्रखरतेने होत आहेत. या शोमध्ये अंकिता लोखंडे, विक्की जैन, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, ईशा मालवीय, अभिषेक कुमार, सनी आर्य, अनुराग डोवाल, जिग्ना वोहरा, मुन्नवर फारुकी, फिरोजा खान, मन्नारा चोप्रा, समर्थ जुरेल, रिंकू धवन, अरुण श्रीकांत, सना रईस खान आदी कलाकार आहेत.
नुकत्याच झालेल्या एलिमिनेशन राऊंडमध्ये नवेद सोलला घराबाहेर जावे लागले आहे. यानंतर आता वाईल्ड कार्ड एन्ट्रीची चर्चा सुरु झालेली पाहायला मिळत आहे. टेलिचक्करच्या रिपोर्टनुसार, राखी सावंत पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार असल्याची बातमी समोर आली आहे. राखीबरोबर तिचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीही ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्यांच्या प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
राखी सावंतचे ‘बिग बॉस’बरोबर जुने नाते आहे. तिने ‘बिग बॉस’च्या अनेक पर्वात याआधी प्रवेश केला आहे. राखी बिग बॉसच्या सिझन १, १४ व १५ मध्ये दिसली होती. जेव्हा राखी ‘बिग बॉस १४’ मध्ये आली तेव्हा तिने तिच्या लग्नाबाबत खुलासा केला होता. ‘बिग बॉस १५’ मध्ये राखी तिचा पती रितेशबरोबर शोमध्ये आली होती. राखी नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असते.
‘बिग बॉस १५’नंतर राखी रितेशपासून वेगळी झाली आणि ती आदिल खान दुर्रानीसह रिलेशनशिपमध्ये आली. त्यानंतर राखीने आदिलसह गुपचूप लग्न केले. मात्र, नंतर राखीने आदिलवर फसवणूक व घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. राखीने आदिलविरोधात तक्रारही दाखल केली होती, त्यानंतर तो तुरुंगातही गेला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिलने पत्रकार परिषद घेऊन राखीवर गंभीर आरोप केले. यावर राखीनेही मौन सोडलेलं पाहायला मिळालं.