बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही सतत चर्चेत असलेली बघायला मिळते. आजवर करीना अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. २०१२ साली ती अभिनेता सैफ अली खानबरोबर लग्नबंधनात अडकली. त्यांना तैमुर व जेह अशी दोन मुलं आहेत. करीना व सैफ दोन्ही मुलांची काळजी घेताना दिसत असतात. त्यांचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आशातच आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सैफ व करीना मुलांच्या शाळेत कार्यक्रमात दिसून आले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी करीना खूप कॅज्युअल लूकमध्ये दिसून आली. (kareena kapoor viral video)
सोशल मीडियावर एक क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये करीना मुलगा जेहला सपोर्ट करताना दिसत आहे. जेहने एका छोट्या हत्तीचा वेश परिधान केला होता. यामध्ये जेह खूपच गोड दिसत होता. दरम्यान यावेळी त्याची आई म्हणजे करीना जेहला ओरडून प्रोत्साहन देताना दिसली. जेहला स्पॉटलाइटमध्ये बघून करीनाला खूप आनंद झालेलादेखील दिसून आला.
kareena as a proud mother, saif and tim filming jeh's school presentation. the family they are. 🥹🤍 pic.twitter.com/gk3IOJc4EF
— letícia (@itsmeletii) December 17, 2024
काही लोकांनी मंचावर जेहला बघताच खूप आनंद झाला आहे. तसेच करीनाला बघूनही चाहत्यांना खूप आनंद झालेला दिसून येत आहे. दरम्यान हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “करीना व जेहचा हा व्हिडीओ बघून मला अचानक आई बनण्याची इच्छा झाली आहे”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “बेबोने तिचे चांगले आयुष्य तयार केले आहे”. दरम्यान करीना या व्हिडीओमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे.
दरम्यान सध्या करीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिसली होती. तसेच आता ‘दायरा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजारने केले आहे. सैफबद्दल सांगायचे तर, ‘देवरा: पार्ट १’ नंतर तो ‘ज्वेल थीफ: द रेड सन चॅप्टर’मध्ये दिसणार आहे. यामध्ये तो राजा चौहानच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.