आज ५ ऑगस्ट २०२४ पासून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये श्रावण महिना सुरू झाला आहे. आज पहिला श्रावण सोमवार आहे. भगवान शंकराची आराधना आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या पवित्र महिन्यात भगवान शंकराची आराधना केल्याने भोलेनाथ लवकरच प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात अशी भक्तांची मान्यता आहे. सामान्य भक्तांप्रमाणे मराठी कलाविश्वतीलही अनेक कलाकार मंडळींनी आजच्या श्रावण सोमवारनिमित्त खास पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या श्रावण महिन्यानिमित्त कलाकारांनी पोस्ट शेअर करत श्रावण महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत यापैकी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी. (Prajkta Mali on Instagram)
प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियाद्वारे आध्यात्मिक पोस्टही शेअर करत असते. प्राजक्ता जितकी बोल्ड, विचारी, सुसंस्कारी आहे तितकीच ती शिवभक्त आहे. महादेवावर विश्वास ठेवून त्याची पूजा अर्चा करण्यात ती कायमच तल्लीन असते. अशातच तिने आजच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त खास फोटो शेअर केला आहे. तसेच या पोस्टद्वारे तिने एक निश्चय केल्याचेही सांगितले आहे.
प्राजक्ताने नुकतीच नाशिक येथील त्र्यंबकेश्वर या भगवान शंकरांच्या मंदिराला भेट दिली. याच मंदिरातील काही खास फोटो प्राजक्ताने आजच्या पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त शेअर केले आहेत. हेचं फोटो शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “दुसरं ज्योतिर्लिंग दर्शन पुर्ण. आज श्रावण मासारंभ… पुढची यात्रा लवकर पुर्ण व्हावी हेच “देवादी देव – महादेवांकडे” प्रार्थना” प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला असून मंदीराच्या गाभाऱ्यातील व मंदीराबाहेरील खास फोटो शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. चाहत्यांनी या फोटोखाली “ॐ नमः शिवाय, प्राजु तुझी इच्छा नक्की पुर्ण होवो हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम्” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कृतीचे कौतुक केले आहे. प्राजक्ता नेहमीच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. अशातच तिची ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.