Bigg Boss 18 Vivian Dsena : ‘बिग बॉस १८’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या या हिंदी ‘बिग बॉस’मध्ये एकापेक्षा एक स्पर्धक पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस १८’मधील विवियन डिसेना या स्पर्धकाची विशेष चर्चा रंगली आहे. विवियन डिसेनाची तुलना ‘बिग बॉस’ १३ मधील सिद्धार्थ शुक्लाशी केली जात आहे. त्याचे चांगले दिसणे, समजूतदार वृत्ती या सगळ्या गुणांमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विवियनला पाहून त्याच्या प्रसिद्धीचा अंदाज लावला जात असला तरी त्याचे वैयक्तिक आयुष्यही सतत चर्चेत असते. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये त्याने पत्नीबाबत धक्कादायक खुलासे केला असल्याचं समोर आलं आहे.
अभिनेत्याने यापूर्वी २०१३ मध्ये ‘प्यार की ये एक कहानी’ सह-अभिनेत्री वहबिज दोराबजीबरोबर लग्न केले होते. परंतु २०२१ मध्ये त्यांचे हे नाते संपुष्टात आले. २०२२ मध्ये अभिनेता पुन्हा प्रेमात पडला आणि त्याने पत्रकार नूरन अलीशी लग्नगाठ बांधली. विवियन डिसेना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच बोलतो, म्हणून जेव्हा त्याने याबद्दल खुलासा केला तेव्हा त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. ‘बिग बॉस १८’ मधील शिल्पा शिरोडकरशी झालेल्या संभाषणात विवियनने खुलासा केला की, तो एका मुलाखतीदरम्यान नूरनला भेटला आणि तिच्या प्रेमात पडला.
तथापि, त्याने हे देखील सांगितले की, जेव्हा तो नूरनला भेटला आणि तिला डेट करु लागला तेव्हा त्याने त्याची माजी पत्नी वहबिझ दोराबजीपासून अधिकृतपणे घटस्फोट घेतला नव्हता. विवियनच्या कबुलीमुळे आश्चर्यचकित झालेल्या शिल्पाने त्याला त्या वेळेबद्दल विचारले. ज्यावर त्याने सांगितले की, तोपर्यंत तो वहबिझपासून वेगळा झाला होता आणि अधिकृतपणे घटस्फोटाच्या कागदपत्राचे काम सुरु झाले होते. आणि हे अगदी शेवटी निश्चित झाले आणि तोपर्यंत तो नूरनला डेट करत होता. त्यामुळे त्यात फसवणूक झाली नाही. अंतिम पेपरवर्क आणि त्यानंतर सर्व काही झाले”, असे विवियन म्हणाला.
विवियनने सांगितले की, ‘दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे वाद होत होते. वाहबिझ जोपर्यंत त्याला सहन करु शकत होती तोपर्यंत त्याच्याबरोबर राहिली आणि नंतर जेव्हा तिला खूप कठीण झाले तेव्हा ती निघून गेली’.