Salim Khan On Salman Khan : सध्या बॉलिवूडमध्ये सलमान खान व लॉरेन्स बिश्नोई या दोन नावांचा सर्वाधिक उल्लेख केला जात आहे. अलीकडे बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणानंतर ही चर्चा अधिकच रंगली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने यापूर्वीही सलमान खानच्या घरावर हल्ला करुन अनेक कट रचले होते. या सगळ्या दरम्यान सलमान खानचे वडील सलीम यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सध्या सलमान खान अत्यंत कडक सुरक्षेत आहे. घरापासून शूटिंग स्पॉटपर्यंत सलमानची प्रत्येक हालचाल पोलिसांच्या सुरक्षेत होत आहे. दुसरीकडे सलमानला बिश्नोई टोळीकडून सतत धमक्या दिल्या जात आहेत. या संपूर्ण प्रकरणादरम्यान, सलीम खान या विषयावर खुलेपणाने बोलले आहेत.
सलीम खान म्हणाले की, “सलमानने कधीही कोणत्याही प्राण्याची हत्या केली नाही. सलमानने कधी झुरळही मारले नाही. आमचा हिंसाचारावर विश्वास नाही”. ‘एबीपी न्यूज’शी संवाद साधताना, सलीम खान यांनी लॉरेन्स बिश्नोईच्या वतीने सलमानच्या माफीच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली. सलीम खान म्हणाले की, “लोक आम्हाला सांगतात की, तुम्ही जमिनीकडे बघून चालता, तुम्ही खूप सभ्य माणसं आहात. मी त्यांना सांगतो की, ही शालीनतेची बाब नाही, मला भिती वाटते की माझ्या पायाखाली किडाही येऊन जखमी होईल. मी त्यांनाही वाचवत राहतो”.
आणखी वाचा – नवऱ्यासह महेश मांजरेकरांना भेटली अंकिता वालावलकर, रंगल्या गप्पा, म्हणाले, “तूच बरोबर होतीस आणि…”
सलीम खान म्हणाले की, “बीइंग ह्युमनने किती लोकांना मदत केली आहे. कोविडनंतर याला नकार देण्यात आला, त्यापूर्वी रोज लांबच लांब रांगा लागायच्या. काहींना ऑपरेशन करायला मदत लागली, काहींना इतर मदतीची गरज होती. रोज चारशेहून अधिक लोक मदतीच्या आशेने येत असत”. चिंकारा प्रकरणाबाबत लॉरेन्स बिश्नोई यांनी सलमान खानकडे जोधपूरमधील बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागण्याची मागणी केली होती. तसे न केल्यास सलमान खानला जीवे मारण्याची धमकी बिश्नोई टोळीने दिली होती.
आणखी वाचा – सलमान खानने खरेदी केली कोटींची नवीन बुलेट प्रूफ व हायटेक कार, लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सतत अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. त्यांचे पुढील टार्गेट सलमान खान असल्याचे त्यांनी आणि त्यांच्या टोळ्यांनी सांगितले आहे. या दरम्यान, अभिनेत्याने नवीन बुलेट प्रूफ कार खरेदी केली आहे, ज्याची चर्चा सर्वत्र आहे. सलमानने बुलेट प्रूफ असलेली नवी निसान पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे.