बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या शरीरातील रक्त…”, कृष्णा अभिषेकची गोविंदासाठी भावुक पोस्ट, म्हणाला, “लवकर बरे व्हा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 12, 2024 | 2:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
krushna abhishek on govinda

कृष्णा अभिषेकची मामा गोविंदासाठी भावनिक पोस्ट

काही दिवसांपूर्वी अभिनेता गोविंदाच्या बाबतीत एक बातमी समोर आली होती. स्वतःची बंदूक साफ करताना त्याच्या पायाला गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर काही दिवसानंतर त्याला रुग्णालयातून सोडून देण्यात आले. त्याच्याबद्दल हा प्रकार घडल्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी गोविंदा लवकर बरा व्हावा अशी प्रार्थनादेखील केली. आता गोविंदा बरा होत असून त्याबद्दलच्या अपडेट समोरही येत आहेत. अशातच आता गोविंदाचा भाचा कृष्णाने मामा गोविंदासाठी एक भावनिक पोस्ट केली आहे. ज्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये असे काय आहे? आणि याची इतकी का चर्चा होत आहे? याबद्दल जाणून घेऊया. (krushna abhishek on govinda)

गेल्या अनेक वर्षांपासून गोविंदा व कृष्णा यांच्या नात्यामध्ये मतभेद होते. मात्र आरती सिंहच्या लग्नात सगळे कुटुंबीय एकत्र आलेले दिसून आले. आता त्याने एक पोस्ट शेअर केली असून मामा लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. कृष्णाने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये एकदा राजा बाबू हे पात्र साकारलं होतं. ही क्लिप त्याने सोशल मीडियावर शेअर करत एक पोस्ट लिहिली असून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss 18 च्या पहिल्या ‘विकेण्ड का वार’मध्ये सलमान खान व गुणरत्न सदावर्तेची धमाल, म्हणाले, “मी म्हटलं तर मुंबई चालू नाहीतर…”

View this post on Instagram

A post shared by Krushna Abhishek (@krushna30)

कृष्णाने लिहिले की, “मी खूप हुशार आहे असं लोक म्हणतात. पण माझ्या शरीरात अर्ध रक्त जर गोविंदा मामा सारख्या हुशार माणसाचं असल्याने मी हुशार तर असणारच. खूप प्रेम चीची मामा. हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही लवकर बरे व्हा. मला तुमच्याबरोबर नाचायचं आहे”.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारुमुळे दिशाचा पर्दाफाश, अहिल्यादेवींसमोर सत्य येताच कानाखाली मारली अन्…; प्रोमो तुफान व्हायरल

कृष्णाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये करिश्मा कपूरदेखील दिसून येत आहे. या पोस्टवर आरती सिंह, सलीम मर्चंट, सुधांशु पांडे, राजिव ठाकूर आशा कलाकरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. गोविंदाचा मुलगा यशवर्धननेदेखील या पोस्टला पसंती दर्शवली आहे. कृष्णाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो नुकताच ‘लाफ्टर शेफ’मध्ये दिसून आला होता. यामध्ये त्याची पत्नी काश्मिरा शाहदेखील दिसून आली होती.      

Tags: emotional postgovindakrushna abhishek
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Pushkar Shrotri directed and Saie Tamhankar Mukta Barve in Asambhav movie announcement teaser out

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित मराठी चित्रपटाची घोषणा, टॉपचे कलाकार मुख्य भूमिकेत, टीझरची चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.