सध्या सर्वत्र दुर्गापूजेची चर्चा सुरु आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकारदेखील यासाठी अधिक उत्साही असलेले दिसतात. दुर्गापूजेनिमित्ताने अभिनेत्री काजोल मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेली पाहायला मिळते. काजोल दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील अत्यंत दिमाखात हा उत्सव साजरा करताना दिसत आहे. तसेच ती दुर्गापूजेसाठी जो मंडप उभारते तिथे ती सर्व ठिकाणी देखरेखदेखील करताना दिसते. नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये ती तिथे उपस्थित असणाऱ्यांना आणि गोंधळ घालणाऱ्यांना ती ओरडताना दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी काजोलवर निशाणा साधला असून तिच्या व्हिडीओवर प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. आशातच आता काजोलचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. (kajol viral video)
काजोल दुर्गापूजेमध्ये उत्साहाने सहभाग घेताना दिसत आहे. नुकतीच ती एका व्हिडीओमध्ये दिसून आली आहे. यामध्ये ती जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसून येत आहे. तसेच तिच्याबरोबर मुलगा युग व नवरा अजय देवगणदेखील दिसून येत आहे. अजय व युगने निळ्या रंगाचे सारखे कुर्ते परिधान केले आहेत. तिघेही एकत्र खूप छान दिसत आहेत. यावेळी ते माध्यमांना फोटो काढण्यासाठी पोजदेखील देत आहेत. पण पोज देताना काजोलच्या एका कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
काजोल कुटुंबाबरोबर फोटो काढताना ती अजयच्या हाताला चिमटा काढताना दिसत आहे. तसेच चिमटा काढल्यानंतर अजय तिच्या खांद्यावर हात ठेवतो. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक नेटकरी त्यावर प्रतिक्रियादेखील देत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली की, “ती त्याला खांद्यावर हात ठेवण्यास सांगत आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “नवऱ्याला सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात”, तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “सगळे नवरे बायकांबरोबर असेच वागतात”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “दोघांचं नातं खूप गोड आहे”.
आणखी वाचा – Phullwanti Movie Review : कॅमेरामॅनच्या नजरेतून फुलली ‘फुलवंती’
यापूर्वी काजोलने दुर्गा पूजा पंडालमध्ये जया बच्चनबरोबरचा एक खास क्षणही शेअर केला होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोघांनी एकमेकींना मिठी मारली. जयानेही काजोलला तिच्या गालावर प्रेमाने किस केले. त्यांच्यातील हे बॉन्ड पाहून लोक त्यांचेही कौतुक करत आहेत.