रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सलमान खानच्या पाया पडले अनिरुद्धाचार्य महाराज? बिग बॉस १८ च्या सेटवरील फेक फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीला अटक

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 15, 2024 | 2:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss aniruddhacharya maharaj

अनिरुद्धाचार्य सलमान खानच्या पाया पडले ?

‘बिग बॉस’चे सध्या १८ वं पर्व खूप चर्चेत आहे. ६ ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर पार पडला होता. या शोचे होस्ट सलमान खानने सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांची ओळख करुन दिली. यावेळी स्पर्धकांसह एका व्यक्तीने सगळ्या जनतेचे लक्ष वेधून घेतले. ही व्यक्ती म्हणजे सोशल मीडियावर अधिक सक्रिय असलेले अनिरुद्धाचार्य महाराज. त्यांच्या ‘बिग बॉस’मध्ये येण्याने त्यांचे चाहते अधिक नाराज झालेलेदेखील दिसून आले. या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर त्यांना टीकेचा सामनादेखील करावा लागला होता. सोशल मीडियावर अनिरुद्धाचार्य यांचा मोठा चाहतावर्ग आहे. पण त्यांनी या कार्यक्रमामध्ये येणं अनेकांना रुचलं नाही. नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या होत्या. अशातच आता त्यांनी स्वतः चाहत्यांची माफी मागितली आहे. (bigg boss aniruddhacharya maharaj)

अशातच आता त्यांच्याबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे. अनिरुद्धाचार्य यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये अनिरुद्धाचार्य सलमान खानच्या पाया पडताना दिसत आहे. याचा खुलासा स्वतः अनिरुद्धाचार्य यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, “ज्या कोणी हा चुकीचा फोटो अपलोड केला आहे त्या व्यक्तीला अटक करण्यात आले आहे”.

आणखी वाचा – Atul Parchure Death : सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे अनंतात विलीन, शेवटचं पाहताना सगळेच ढसाढसा रडू लागले अन्…

View this post on Instagram

A post shared by Dr. Aniruddhacharya Ji (@aniruddhacharyajimaharaj)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव मोहम्मद आसिफ अली आहे. याने अनिरुद्धाचार्य यांच्या यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असून समाजामध्ये राग निर्माण केल्याचे आरोप केले आहेत. आरोपीचा फोटो शेअर करत अनिरुद्धाचार्य यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, “महाराजांना अपमानित करण्यासाठी या फोटोबरोबर छेडछाड करण्यात आली आहे. तसेच हा फोटो सोशल मीडियावर टाकून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. पण आता पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आले आहे”.

आणखी वाचा – Atul Parchure Death : अतुल परचुरेंच्या अखेरच्या दर्शनासाठी सुप्रिया पाठारे उपस्थित, शेवटचा निरोप देताना अभिनेत्री भावुक

दरम्यान याआधी अनिरुद्धाचार्य यांनी ‘बिग बॉस’ येण्यामुळे चाहत्यांची माफी देखील मागितली होती. पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “जर माझ्या ‘बिग बॉस’मध्ये जाण्याने कोणाही सनातनी व्यक्तीचे मन दुखावलं असेल तर हा मुलगा, हा भाऊ, तुमचा दास सर्व सनातनी लोकांची माफी मागत आहे. पण मला कृपया क्षमा करा. कारण माझा उद्देश फक्त सनातन धर्माचा प्रचार करणं हा आहे”.  दरम्यान आता खोट्या फोटोमुळे खूप चर्चेत आले आहेत.

Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Atul parchure death at the age of 57 wife Sonia supported to actor in his tough time

साताजन्माची साथ अपूर्णच! अतुल परचुरेंच्या आजारपणात पत्नी सोनिया यांनी दिला होती खंबीर साथ, स्वत:च सांगितलेली संपूर्ण परिस्थिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.