बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘Bigg Boss 18’च्या घरात विवियन डिसेनाचं खासगी आयुष्यावर सतत भाष्य, घटस्फोटाबाबत म्हणाला, “मला तिने सहन…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 16, 2024 | 12:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
vivian dsena on divorce

विवियन डिसेनाने घटस्फोटावर केलं भाष्य

टेलिव्हिजन अभिनेता विवियन डिसेना सध्या ‘बिग बॉस १८’मुळे  खूप चर्चेत आहे. आजवर त्याने अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते. ‘मधुबाला’, ‘शक्ति’, ‘सिर्फ तुम’ व इतर अनेक मालिकांमध्ये त्याने  महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘प्यार की एक कहाणी’ या मालकेमध्ये काम करत असताना त्याची ओळख अभिनेत्री वाहबीज दोराबजीबरोबर झाली. सेटवरच त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या सात वर्षानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. नंतर तो नुरान अली बरोबर लग्नबंधनात अडकला. (vivian dsena on divorce)

‘बिग बॉस’चा सध्या दुसरा आठवडा सुरु आहे. अनेक सदस्यांच्या खासगी आयुष्याबद्दल खूप चर्चादेखील ऐकायला मिळते. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये विवियन व शिल्पा शिरोडकर बोलत असतात. यावेळी शिल्पा यांनी पत्नी नुरानबद्दल चर्चा केली. नुरानबरोबर पहिली भेट कशी झाली? असं विचारलं. यावेळी त्याने सांगितले की, “नुरान पत्रकार आहे. त्यावेळी तिला एका मुलाखतीसाठी मी चार महीने वाट बघायला लावली होती. त्याचा बदला ती आजपर्यंत घेत आहे”.

आणखी वाचा – Bigg Boss 18 मध्ये होणार मिड वीक एलिमिनेशन, ‘हा’ स्पर्धक जाणार घराबाहेर? सदस्यांनीच घेतला निर्णय?

View this post on Instagram

A post shared by Vivian Dsena (@viviandsena)

यानंतर शिल्पाने त्याच्या घटस्फोटाबद्दल आणि पहिल्या पत्नीबद्दलदेखील विचारले. तेव्हा तो म्हणाला की, “मी नुरानला भेटलो तेव्हा मी घटस्फोटीत होतो”. शिल्पा यांनी नंतर विचारले की, “कीती काळ तुम्ही विवाहित होतात?” त्यावर विवियनने सांगितले की, “मला नाही माहीत. जोपर्यंत तिने मला सहन केलं आणि मी नक्की कोण आहे हे तिला जेव्हा समजलं तेव्हापर्यंतच ती माझ्याबरोबर होती”.

आणखी वाचा – “बॉलिवूडने अंडरवर्ल्डच्या जगापासून दूर राहिले पाहिजे”, ‘बिग बॉस १८ मधून बाहेर पडताच गुणरत्न सदावर्ते यांचं भाष्य, म्हणाले, “याचे परिणाम…”

पुढे त्याने सांगितले की, “जोपर्यंत काही चुकीचं घडत नाही तोपर्यंत काही चांगलंदेखील घडत नाही. तसेच माझ्यामध्ये झालेला बदल हा एका रात्रीत झालं नाही. पण नुरान चांगली आहे. ती माझ्या आयुष्यात आहे त्यामुळे खूप सुखी आहे”. दरम्यान विवियन वाहबीजबरोबर २०१३ साली लग्नबंधनात अडकला होता. मात्र २०२१ साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०२२ साली तो पत्रकार नुरानबरोबर लग्नबंधनात अडकला.  

Tags: bigg bossBigg Boss 18divorcevivian dsena
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
akshay kelkar home tour

लाकडी टच, स्वामी समर्थ व महाराजांची मूर्ती अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने इतकं सुंदर सजवलं आहे घर, पाहा Inside Video

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.