Bigg Boss 18 Troll : ‘बिग बॉस १८’ चा महाअंतिम सोहळा नुकताच दणक्यात पार पडला. सलमान खानने होस्ट केलेल्या या रिॲलिटी शोने प्रेक्षकांना शेवटपर्यंत पडद्यावर खिळवून ठेवले. ग्रँड फिनाले संपल्यानंतर, शोला अखेर विजेता मिळाला आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून करणवीर मेहरा आहे. दरम्यान, विवियन डिसेना या शोचा उपविजेता ठरला. मात्र चित्र असे दिसत आहे की, करणने हा शो जिंकल्यामुळे बहुतेक लोक खूश नाही आहेत आणि याचा पुरावा सोशल मीडियावरवर स्पष्टपणे दिसत आहे. तीन महिन्यांचा नॉन स्टॉप ड्रामाचा प्रवास करणवीर मेहराने ट्रॉफी उचलून संपवला. त्याने ‘खतरों के खिलाडी १४’ हा शोदेखील जिंकला होता आणि त्यानंतर तो ‘बिग बॉस १८’चा विजेता देखील बनला.
विजेत्या अभिनेत्याला ५० लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले, परंतु असे दिसतेय की लोक त्याच्या विजयावर फारसे खूश नाहीत आणि ते शोला स्क्रिप्टेड देखील म्हणत आहेत. त्याच्या विजयापासून, ट्विटरवर दोन हॅशटॅग ट्रेंड करत आहेत ते म्हणजे ‘scripted’ आणि ‘Bigg boss fixed winner show’. याचा स्पष्ट अर्थ करणच्या विजयावर लोक अजिबात खूश नाहीत. त्यामुळे निर्माते जाणूनबुजून एखाद्याला जिंकायला लावतात असे मानणे योग्य ठरेल का?, कारण आता हा प्रश्न त्यांच्यापुढे दरवर्षी पडत आहे.
सुरुवातीपासूनच करण मतदानाच्या बाबतीत एकदाही आघाडीवर नव्हता. त्याच्या विजयानंतर लोकांच्या प्रतिक्रियाही खूप काही सांगून जातात. यावेळी विजेत्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत पण सर्वात मोठा प्रश्न शो संबंधित आहे. महाअंतिम फेरीत रजत दलाल तिसऱ्या क्रमांकावर, तर अविनाश मिश्रा आणि चुम दरंग चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर बाहेर पडले. ईशा सिंग ही फायनलमधून बाहेर पडणारी पहिली स्पर्धक होती.
आणखी वाचा – दारूचं व्यसन, दोन घटस्फोट अन्…; ‘बिग बॉस १८’चा विजेता करणवीर मेहरावर ओढवलेला वाईट काळ, घडलं होतं असं की…
‘बिग बॉस १८’ या शोमध्ये एकूण १८ स्पर्धक सहभागी झाले होते जसे की YouTubers, अभिनेता, वकील, सोशल मीडिया प्रभावक आणि मॉडेल. यामध्येमध्ये करणवीर मेहरा, विवियन डिसेना, ईशा सिंग, चुम दरंग, शिल्पा शिरोडकर, रजत दलाल, शेहजादा धामी, एलिस कौशिक, हेमा शर्मा, तजिंदर बग्गा, श्रुतिका अर्जुन, चाहत पांडे, न्यारा बॅनर्जी, मुस्कान बामने, आरफीन खान, अरफीन खान यांचा समावेश आहे. गुणरत्न सदावर्ते यांसारख्या खान सुप्रसिद्ध नावांचा समावेश होता.