गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दारूचं व्यसन, दोन घटस्फोट अन्…; ‘बिग बॉस १८’चा विजेता करणवीर मेहरावर ओढवलेला वाईट काळ, घडलं होतं असं की…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 20, 2025 | 11:14 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Karan Veer Mehra Lifestyle

दारूचं व्यसन, दोन घटस्फोट अन्…; 'बिग बॉस १८'चा विजेता करणवीर मेहरावर ओढवलेला वाईट काळ, घडलं असं की…

Karan Veer Mehra  Lifestyle : सलमान खानचा रिॲलिटी शो ‘बिग बॉस सीझन १८’ चा ग्रँड फिनाले नुकताच संपन्न झाला. यंदाच्या या सिझनमध्ये ‘बिग बॉस’ची मानाची ट्रॉफी करणवीर मेहरा याने जिंकली. त्यामुळे करणवीर मेहरा सध्या खूप चर्चेत आहे. तिने रोहित शेट्टीच्या रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी सीझन १४’ चेही विजेतेपद पटकावले आहे. ‘बिग बॉस १८’ च्या विजेतेपदावर करणवीर मेहराने आपलं नाव कोरलं आहे. ‘बिग बॉस १८’ च्या विजेत्याला ‘बिग बॉस’ची ट्रॉफी मिळाली असून ५० लाख रुपये रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. करणवीर मेहरा गेल्या १९ वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. त्याने अनेक टीव्ही शो केले. २००५ पासून त्याने टीव्हीच्या दुनियेत प्रवेश केला. पण त्याआधी तो रंगभूमीवर सक्रिय होता.

अभ्यासात कमी आणि अभिनय क्षेत्रात जास्त सक्रिय असल्याचे त्याने सांगितले होते. २००५ मध्ये त्याने ‘रिमिक्स’ या मालिकेपासून त्याच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्याने वेगवेगळ्या शोमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या.अंकिता लोखंडेबरोबर ‘पवित्र रिश्ता’ मध्येही काम केलं. ‘बातें कुछ अंकही सी’, ‘बेहेनीन’, ‘विरद्ध’, ‘पुका – दिल से दिल तक’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये करणने महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. याशिवाय त्याने चित्रपटांमध्येही काम केले. ‘रागिनी एमएमएस 2’, ‘लव्ह स्टोरी २०५०’, ‘बदमाशियां’, ‘मेरे डॅड की मारुती’मध्ये तो झळकला. ‘पॉइजन 2’, ‘इट्स नॉट सिंपल’ आणि ‘आमेन’ या वेबसीरिजमध्येही त्याने काम केले.

आणखी वाचा – हल्लेखोरासाठी दोन वकिलांमध्ये भांडण, सैफ अली खान प्रकरणी सुनावणीदरम्यान वेगळंच नाटक सुरु, नक्की काय आहे प्रकरण?

करणवीर मेहराचे वैयक्तिक आयुष्य त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा जास्त चर्चेत राहिले. त्याने आयुष्यात दोनदा लग्न केले आहे. पहिले लग्न २००९ मध्ये झाले होते आणि आठ वर्षांनी २०१८ मध्ये हे नाते संपले होते. त्याने त्याची बेस्ट फ्रेंड देविका हिला १० वर्षे डेट केले आणि नंतर लग्न केले. पण हे लग्न तुटल्यामुळे तो दु:खी झाला आणि या सगळ्याला स्वत:ला जबाबदार समजू लागला. त्याने ‘बॉम्बे टाईम्स’ला सांगितले होते की, “त्याने लग्न केले नसते तर दोन आयुष्य उद्ध्वस्त झाले नसते”.

View this post on Instagram

A post shared by KaranVeerMehra (@karanveermehra)

करणवीर मेहराने २०२१ मध्ये अभिनेत्री निधी सेठशी दुसरे लग्न केले. त्यांनी गुरुद्वारात सात जन्माचे वचन दिले होते. पण नंतर त्यांच्यात काहीच सुरळीत होत नव्हते आणि २०२३ मध्ये त्यांचे हे नातेही तुटले. ‘खतरों के खिलाडी १४’मध्ये तो शिल्पा शिंदेबरोबर लग्नाबद्दल बोलताना तो दिसला होता. यावर तो म्हणाला होता की,’ते खूप चांगले मित्र आहेत आणि एकमेकांशी मस्करी करत राहतात. पण भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही’. पहिले लग्न तुटल्यानंतर करणवीर मेहराने म्हटले होते की, जर त्याने दुसरे लग्न केले नाही तर त्याला नक्कीच वडील व्हायचे आहे.

आणखी वाचा – जबरदस्त डान्स अन् कलाकारांचा दंगा, शिवानी सोनार व अंबर गणपुळेच्या संगीत सोहळ्याचा Inside Video

मात्र ‘नवभारत टाइम्स’शी बोलताना त्याने आता हे करणार नसल्याचे सांगितले. कारण मुलांचे संगोपन करणे सोपे नाही. त्याची इच्छा असल्यास तो आपल्या बहिणीच्या मुलांना दत्तक घेऊ शकतो. २०१६ मध्ये करणवीर मेहराचा भीषण बाइक अपघात झाला होता. पाच महिन्यांहून अधिक काळ अंथरुणाला खिळून असल्याचे त्यांनी सांगितले. त्या दिवसांत तो झोपण्यासाठी दारू प्यायचा आणि त्यामुळे त्याला दारूचे व्यसन लागले. मात्र, नंतर त्याने स्वत:वर नियंत्रण ठेवले आणि पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला.

Tags: bigg boss 18 winnerkaran veer mehraKaran Veer Mehra  Lifestyle
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Bigg Boss 18 Troll

Bigg Boss 18 : करणवीर मेहराच्या विजयाने प्रेक्षकांना धक्का, ठरवून केलं असल्याचा दावा, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.