‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरचरण सिंगची प्रकृती अत्यंत वाईट असल्याचं समोर आलं आहे. एकीकडे तो सध्या रुग्णालयात दाखल असताना दुसरीकडे कर्जाच्या ओझ्यानेही खचला आहे. सिंह यांची जवळची मैत्रीण भक्ती सोनी हिने गुरुचरण यांच्यावर करोडोंचे कर्ज असल्याचा खुलासा केला होता. अशातच आता गुरुचरणला हॉस्पिटलमधू डिस्चार्ज मिळाला आहे. अभिनेत्याने स्वत: इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत याबद्दल सांगितले आहे. गुरुचरण सिंहने व्हिडीओ शेअर करत त्याच्या या कठीण काळात लोकांनी केलेल्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद म्हटलं आहे. तसंच त्याने चाहत्यांना आश्वासन दिले की, तो आता ठीक आहे आणि घरी पोहोचला आहे. (Gurucharan Singh discharged)
या व्हिडीओमध्ये गुरुचरणने असं म्हटलं आहे की, “सगळ्यात आधी वाहेगुरुंना खूप खूप कोटी कोटी धन्यवाद. तसंच ज्या ज्या लोकांनी मला मदत केली होती. माझ्यासाठी प्रार्थना केली होती त्या सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद”. यापुढे त्याने म्हटलं की, “मला मनापासून काम करायचे आहे. काही प्रयत्न करून स्वतःसाठी पैसे कमवायचे आहेत”. पुढे त्याने सर्वांच्या पाठिंब्याची विनंती केली आणि सांगितले की, त्यांच्यावर खूप कर्ज आहे, जे त्यांना फेडायचे आहे. देवाच्या आशीर्वादाने हे घडेल असंही म्हटलं आणि यासाठी तो खूप आशावादीही आहे.
आणखी वाचा – जबरदस्त डान्स अन् कलाकारांचा दंगा, शिवानी सोनार व अंबर गणपुळेच्या संगीत सोहळ्याचा Inside Video
काही दिवसांपूर्वी अभिनेत्याच्या मैत्रिणीने Etimes ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्यावरील कर्जाबाबत खुलासा केला होता. यावेळी मैत्रीण भक्ती सोनी म्हणाली होती की, “त्याच्यावर सुमारे १.२ कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र, त्यांच्या वडिलांकडे ५५ कोटींची संपत्ती आहे. परंतु दुर्दैवाने, भाडेकरु मालमत्ता रिकामी करत नसल्याने वाद सुरु आहे. प्रकरण मिटले आणि मालमत्ता विकता आली तर ते कर्ज फेडू शकतील”.
आणखी वाचा – अंकिता वालावलकरच्या लग्नाच्या तयारीसाठी कोकणात पोहोचला डीपी, खास फोटो शेअर करत म्हणाला, “तू बोलवणार आणि…”
दरम्यान, गुरुचरण सिंहची प्रकृती अचानक खालवली असल्याचे वृत्त समोर आले अआणि यामुळे त्याचे अनेक चाहते काळजीत पडले आहेत. गुरुचरणची मैत्रीण भक्ती सोनीने त्याच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली होती. तसंच अभिनेत्यानेही हॉस्पिटलमधून एक व्हिडीओ शेअर केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्याने खाणं-पिणं सोडून दिलं होतं, अशी धक्कादायक माहिती भक्तीने दिली होती. पण तो आता बरा झाला असून सुखरुप् घरी परतला आहे.