नुकतीच शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने सर्वत्र आनंदाचे व चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. घराघरांत-मंडपांमध्ये देवीचे थाटामाटात आगमन झाले आहे. राज्यातही नवरात्रौत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. सामान्य प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींच्या घरीदेखील या नवरात्रीची धामधूम पाहायला मिळत आहे. अनेकांच्या घरी नवरात्रीनिमित्ताने घटस्थापना करण्यात आली आहे आणि यामध्ये कलाकारांचाही समावेश आहे. या कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे जिनिलीया देशमुख. जिनिलीया मूळची महाराष्ट्रातली नसली तरीही मराठी सण, उत्सव, परंपरा ती मोठ्या आनंदाने साजरे करत असते. त्यामुळे देशमुखांच्या सुनबाईंचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक करण्यात येतं. (Genelia Deshmukh Navratri Puja Video)
स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या घरी प्रत्येक मराठी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि यात जिनिलीया अगदी आनंदाने सहभाग घेते. याआधी जिनिलीयाने आषाढी एकादशी असो… गणपती असो… हे मराठी सण आनंदात व उत्साहात साजरे केल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच देशमुखांच्या घरी यंदाची शारदीय नवरात्रदेखील मोठ्या दिमाखात पार पडत असून देशमुखांच्या घरी यानिमित्ताने पूजा केली जात आहे. घरी घटस्थापना केली गेली आहे आणि यांची खास झलक जिनिलीयाने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.
जिनिलीयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रितेश देशमुखची आई व जिनिलीयाची सासू म्हणजेच वैशाली देशमुख या पूजा करताना पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये देशमुखांच्या देवघराचीदेखील संपूर्ण झलक पाहायला मिळत आहे. हे देवघर अगदी भव्य दिव्य असं असून घरात अनेक देवदेवतांच्या प्रतिमा पाहायला मिळत आहेत. गणपती बाप्पा, देवी लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ तसंच अनेक हिंदू देवी-देवतांच्या प्रतिमा असल्याचेही पाहायला मिळत आहे. ‘आईबरोबर घटस्थापना’ असं म्हणत जिनिलीयाने हा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मकर व मीन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा, इतरांच्या नशिबात काय, जाणून घ्या…
दरम्यान, महाराष्ट्राची वहिनी म्हणून जिनिलीया देशमुख ओळखली जाते. जिनिलीया हा जन्माने ख्रिश्चन असली तरी ती आपलं मराठीपण कायम जपत आली आहे आणि तिच्या याच कृतीचे कौतुक होतं. जिनिलीयाने याआधी वटपौर्णिमा, आषाढी एकदाशी, गणपती, दिवाळी असे सगळे सण मोठ्या हौशीने साजरे केले असून याचे खास क्षण ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच नवरात्रीच्या सणाचे खास क्षणही तिने शेअर केले आहेत.