Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’च्या घरात सध्या फॅमिली वीक सुरु असलेला पाहायला मिळत आहे. यावेळी विकी जैन व अंकिता लोखंडे यांची आई ‘बिग बॉस’च्या घरात आली होती. विकी जैनची आई ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आली आहे. घरात गेल्यावर त्यांनी मुलगा विकी व सून अंकिता लोखंडे यांना प्रेमाने एकत्र राहण्याचा सल्ला दिलेला पाहायला मिळाला. ‘टीव्ही ९ हिंदी’सह साधलेल्या एका संवादात, विकीच्या आईने सांगितले की, ‘तिचा मुलगा ‘बिग बॉस १७’ चा विजेता व्हावा’ अशी तिची इच्छा आहे.
विकीची आई म्हणाली, “प्रेक्षकांनी विकीवर प्रेम करत रहावं. तो या शोमध्ये पहिल्यांदाच आला असून तो पुन्हा आपला व्यवसाय सोडून अशा रिऍलिटी शोमध्ये येणार नाही. अभिनेते पुन्हा पुन्हा येतात, त्यांना या क्षेत्रातच काम करायचे असते. पण विकीने हे करू नये. कारण त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. तो पूर्णतः खरा आहे. तो शोमध्ये जसा तो दिसत आहे तितकाच तो खरा आहे. लोकांना तो मनापासून मदत करत असतो तरी लोक त्याला फेक असल्याचं म्हणतात, त्याला या गोष्टीच फार वाईट वाटत. प्रत्येकाला आपापली मत आहेत, त्याला आपण काही करु शकत नाही” असं त्या म्हणाल्या.
त्यांची सून अंकिता लोखंडेही लोकप्रिय सून असली तरी हा ‘बिग बॉस’चा शो लेकानेच जिंकावा अशी विकीच्या आईची इच्छा आहे. त्या म्हणाला,”विकी जिंकून यायला हवा. असं झालं तर खूप आनंद होईल. एका अवॉर्ड फंक्शनला जात असताना विकी मला म्हणाला होता, आई तू आता आमच्याबरोबर येऊ नकोस. मी जेव्हा शो जिंकून येईन तेव्हा तू ये. आता तुला मागे बसून हा सोहळा पाहावा लागेल. मात्र नंतर तुला पुढच्या सीटवर बसून हा सोहळा पाहता येईल, तेव्हा तुला तिथून कोणीही उठवणार नाही. मला असं वाटतंय की, विकीचं हे स्वप्न पूर्ण व्हावं” असं त्या म्हणाल्या.
पुढे विकीची आई म्हणाली, “अंकिता १६-१७ वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहे. विकी पहिल्यांदाच या शोनिमित्त या क्षेत्रात आला आहे. या क्षेत्रातील त्याचा हा शेवटचा प्रवास असू शकतो. कदाचित तो पुन्हा या क्षेत्रात जाणार नाही. त्यामुळे विकी हा शो जिंकावा यासाठी सर्वांनी पार्थना करावी” असंही विकीची आई म्हणाली.