Nupur Shikhare and Ira Khan Marriage : आयरा खान व नुपूर शिखरे यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर यांच्या लग्नापुर्वीच्या फोटो, व्हिडीओने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अमीर खानच्या लेकीच्या लग्नासाठी राजस्थान येथील उदयपूरमधील आलिशान हॉटेलमध्ये थाटमाट सुरु असलेला पाहायला मिळत आहे. ३ जानेवारीला आयरा व नुपूर यांनी मुंबईतील ताज एंड या हॉटेलमध्ये नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा उरकला. यावेळी सिनेसृष्टीतील काही दिग्गज मंडळींना आमंत्रित कऱण्यात आलं होत.
नोंदणी पद्धतीने लग्नसोहळा उरकल्यानंतर आता आयरा व नुपूर यांच्या शाही विवाहसोहळ्याची जय्यत तयारी सुरु असलेली पाहायला मिळत आहे. राजस्थानी थाटमाट असलेल्या उदयपूर येथील ताज पॅलेस या हॉटेलमध्ये ते विवाहबंधनात अडकणार आहेत. खान परिवाराच्या जवळचे नातेवाईक, कुटुंबीय तसेच आयरा व नुपूर यांचा मित्रपरिवार या सोहळ्यासाठी तिथे उपस्थित आहेत. दोन, तीन दिवसांपासून लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाल्याचंही पाहायला मिळालं.
आयराच्या मेहंदी सोहळ्यानंतर तिच्या संगीत सोहळ्याची खास झलक समोर आली आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आयरा व नुपूर यांचा मेहंदी सोहळ्यातील लूकही समोर आला आहे. यावेळी आयराने डिझाइनर घागरा चोळी व त्यावर टोपी असलेलं वेलवेटच जॅकेट परिधान केलं होत. तर नुपूरने सूट बूट व ब्लेझर परिधान केला होता. दोघांचाही हा लूक लक्षवेधी होता. आयराच्या या संगीत सोहळ्यातील एक खास व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आयरा व नुपूर यांच्या संगीत समारंभात आमिर खान कुटुंबासह गाणं गात मैफिल बनवताना दिसला. आमिर खान व त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव यांनी त्यांचा मुलगा आझादला गाणं गाताना साथ दिलेली पाहायला मिळाली. आझादने त्याच्या बहिणीच्या संगीतला ‘फुलों का तारो का सबका केहना है’ हे गाणं गाताना दिसला. या गाणं गाताना साऱ्यांनी त्याला पाठींबा दिला व त्याच कौतुकही केलेलं पाहायला मिळालं.