Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ मध्ये रोहित शेट्टी आल्याने हा भाग अधिक रंजक झालेला पाहायला मिळाला. रोहितने फिनाले मध्ये पोहोचलेल्या पाच स्पर्धकांना कठीण प्रश्न विचारत त्यांना त्यांच्या खऱ्या खेळाचा आरसाही दाखवला. यामुळे सोशल मीडियावर रोहितचे सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय रोहितने स्पर्धकांसह धमाल-मस्ती केली असल्याचंही पाहायला मिळालं. दरम्यान त्याने अंकिता लोखंडेला असेही सांगितले की, विकीने शोच्या बाहेर जाऊन त्याच्या घरी पार्टी केली आहे.
रोहितने अंकिताला असे सांगितले की, “विकी भैया बाहेर पार्टी करत आहे. सना खान, आयेशा खान, ईशा व एक मुलगी देखील होती ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पार्टी केल्यानंतर सर्वजण घरीच राहिले”. रोहितचे बोलणे ऐकून अंकिता आश्चर्यचकित होते आणि म्हणते की, ‘मी त्याला सोडणार नाही’. अंकिताचे हे वक्तव्य ऐकून सगळेच हसायला लागतात.
विकीला पापाराझींनी स्पॉट केलं तेव्हा त्याला सना खानबद्दल देखील विचारण्यात आले. सना देखील त्याच्या पार्टीत आली होती का असं विचारलं असता विकी यावर हसला आणि म्हणाला, “सना तिच्या घरी आहे. सनाजींची कंपनी संपली”. विकी घरातून बाहेर जात असताना अंकिताने त्याला आधीच ताकीद दिली होती की तो बाहेर जाऊन पार्टी करणार नाही. मात्र, विकी घरातून बाहेर पडताच विकीने पहिली गोष्ट केली ती म्हणजे मित्रपरिवार व कुटुंबियांसह पार्टी. अंकिता शोमध्ये असे म्हणताना दिसली होती की, “ती घरी जाऊन सीसीटीव्ही तपासेल की, विकी घरी पार्टी करत आहेत की नाही”.
मात्र, त्यानंतर अभिषेकशी बोलताना अंकिता, “विकी असं करणार नाही, असं असलं तरी आमच्या घरी कोणी येत नाही”, असंही म्हणताना दिसली. आता अंकिता ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यावर काय सत्य आहे हे जेव्हा तिच्यासमोर येईल तेव्हा अंकिता काय करणार हे पाहणं रंजक ठरेल.