शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “मी त्यांचा अपमान…”, अंकिता लोखंडेच्या आईला रागामध्ये फोन केल्यानंतर विकी जैनच्या आईचे स्पष्टीकरण, म्हणाल्या, “त्यांचा कोणत्याही प्रकारे…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 10, 2024 | 9:56 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Bigg boss 17 Ranjana jain talked about I did not wrong to called ankita’s mother see the details

Bigg Boss 17 : “मी त्यांचा अपमान...", अंकिता लोखंडेच्या आईला रागामध्ये फोन केल्यानंतर विकी जैनच्या आईचे स्पष्टीकरण, म्हणाल्या, "त्यांचा कोणत्याही प्रकारे..."

कलर्स वाहिनीवरील चर्चेत राहणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. यंदाचे ‘बिग बॉस’ १७ वे पर्व हे चांगलेच गाजलेले पाहायला मिळाले. हा शो आता अंतिम टप्प्यात आला असून घरात फक्त ९ स्पर्धक राहीले आहेत. अशातच ‘बिग बॉस’ने सर्व स्पर्धकांना एक खास भेट दिली आहे. हा शोच्या अंतिम भाग होण्यापूर्वी, ‘बिग बॉस’ सर्व स्पर्धकांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट करुन देणार आहे. त्यामुळे येत्या ‘फॅमिली स्पेशल’ वीकमध्ये अंकिता व विकीची आई ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहेत. 

नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अंकिता व विकी हे दोघे त्यांच्या आईंना पाहून आनंदी व भावुकही झाले असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अंकिताच्या सासूने तिच्या काही जुन्या गोष्टींची आठवण करुन दिली. अशातच दैनिक भास्करशी संवाद साधताना विकीच्या आईने अंकिताच्या वृत्तीवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी विकीची आई (रंजना जैन) असं म्हणाल्या की, “अंकिताचे विक्कीबरोबरचे वागणे योग्य नाही. अंकिताच्या विकीबरोबरच्या वागण्यामुळे तिच्या आईला याबद्दल सांगितले पाहिजे म्हणून मी अंकिताच्या आईला असे म्हटले की, ‘अंकिताने ज्याप्रकारे विकीला लाथ मारली, तशी तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला लाथ मारली होतीत का? तुम्ही तुमच्या मुलीला हेच शिकवलं आहे का?”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – Video : संकर्षण कऱ्हाडेचं त्याच्या परभणीमधील गावामध्ये सनई-चौघड्यांनी स्वागत, अभिनेताही भारावला, म्हणाला, “माझ्याच गावात…”

यापुढे विकीची आई असं म्हणाली की, “अंकिता चुकीची वागत आहे हे आता आम्ही त्यांना सांगितले नाही तर त्यांना तरी कसे कळणार? त्यामुळे मला वाटत नाही की, मी त्यांना हे विचारुन त्यांचा कोणत्याही प्रकारे अपमान केला आहे.  मी फक्त त्यांना वस्तूस्थिती सांगितली. यापुढे विकीच्या आईने असं म्हटलं की, “खेळापेक्षा नाती महत्त्वाची असतात हे मी दोघांनाही पटवून दिले आहे. आधी तुमचे वैवाहिक आयुष्य बघा, मग खेळ खेळा. खेळ जिंकला पण नातं हरलं तर त्याला काय अर्थ नाही ना?”

आणखी वाचा – आयरा-नूपुरच्या संगीत सोहळ्यात आमिर खानसह पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव व लेक आझादने गायलं गाणं, व्हिडीओ तुफान व्हायरल

त्याचबरोबर विकीच्या आईने सलमान खानमुळे विकीचा खेळ बिघडल्याचे मत व्यक्त केले आहे. यावर ती असं म्हणाली की, “विकी खऱ्या आयुष्यात खूप चांगला माणूस आहे. गेल्या काही आठवड्यांत त्याचा खेळ खराब झाला यावरून सलमानने त्याला अनेक बाबतीत सुनावले आणि हे मला आजिबात आवडले नाही. आजपर्यंत विक्कीबद्दल कोणीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे सलमानचे बोलणे ऐकून त्याला वाटते की तो इतका चांगला खेळत असूनदेखील त्याचे काही ऐकले जात नाही आहे. त्यामुळे विकी खूप दुःखी आहे.”

यापुढे विकीच्या आईने मन्नारा व विकी यांच्या मैत्रीत शंका घेण्यासारखे काहीही नाही असंही म्हटलं आहे. सर्वांना मदत करणे हा विकीचा स्वभाव आहे आणि या घरात तो तेच करत आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, या शोचा विजेता हा विकी जैनचं व्हावा अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Tags: ankita lokhandeankita lokhande mother vickay jain motherbigg boss 17 biss boss newsBollywood entertainmentBollywood entertainment newsbollywood newsentertainemnt newsentertainment newsvicky jainअंकिता लोखंडेअंकिता लोखंडे आईबिग बॉस 17बिस बॉस बातमीबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजनमनोरंजन बातमीविकी जैनविकी जैन आई
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : "त्यानेच शो जिंकावा", विकी जैनच्या आईची भलतीच अट, म्हणाली, "अंकिता १६-१७ वर्ष…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.