रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : संकर्षण कऱ्हाडेचं त्याच्या परभणीमधील गावामध्ये सनई-चौघड्यांनी स्वागत, अभिनेताही भारावला, म्हणाला, “माझ्याच गावात…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 9, 2024 | 6:51 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actor sankarshan karhade shared his play’s experince see the video

Video : संकर्षण कऱ्हाडेचं त्याच्या परभणीमधील गावामध्ये सनई-चौघड्यांनी स्वागत, अभिनेताही भारावला, म्हणाला, "माझ्याच गावात..."

मराठी कलाविश्वातील चतुरस्त्र कलाकार म्हणून संकर्षण कऱ्हाडेचे नाव हे अग्रगण्य आहे. एक उत्तम अभिनेता, एक उत्तम कवी व एक उत्तम माणूस म्हणून अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा लोकप्रिय आहे. त्याच्या अभिनयासह, त्याच्या लिखाणाचे, दिग्दर्शनाचे, कवितांचे तसेच त्याच्या सूत्रसंचालनाचे अनेक चाहते आहेत. संकर्षण त्याच्या अभिनय, लिखाण व सादरीकरणामुळे जितका ओळखला जातो. तितकाच तो एक माणूस म्हणूनही उत्तम आहे आणि याचा प्रत्यय त्याच्या कविता, लिखाण किंवा सादरीकरणामधून वेळोवेळी आला आहे. (Sankarshan Karhade On Instagram)

अभिनेता संकर्षण हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संप्रकात राहत असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या कविता, किस्से, किंवा काही अनुभव वगैरे शेअर करत असतो. त्याच्या या पोस्टला नेटकऱ्यांकडूनदेखील चांगलाच प्रतिसाद मिळतो.  सध्या रंगभूमीवर संकर्षणचे ‘संकर्षण व्हाया स्पृहा’, ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘नियम व अटी लागू’ असे तीन नाटकं चालू आहेत आणि या तिन्ही नाटकांना प्रेक्षकांकडूनदेखील हाऊसफूल प्रतिसाद मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

आणखी वाचा – ‘आओगे जब तुम साजना’ फेम सुप्रसिद्ध गायक राशिद खान यांचे निधन, ५५व्या वर्षी कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी  

अशातच संकर्षणने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टद्वारे त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. नुकताच ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कवितांच्या कार्यक्रमाचा खास प्रयोग संकर्षणच्या गावी अर्थात परभणीमध्ये करण्यात आला आणि यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी व सनई चौघड्यांच्या सुमधुर स्वरात त्यांचे स्वागत करण्यात आले. हेचग स्वागत पाहून संकर्षण भारावून गेला आहे.

आणखी वाचा – कुटुंबासह देवदर्शनानंतर कामाला लागले आदेश बांदेकर, व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकरी म्हणाले, “समृद्धी महामार्ग…”

या पोस्टमध्ये संकर्षणने असे म्हटले आहे की, “’संकर्षण व्हाया स्पृहा’ चा कालचा (८ जानेवारी) परभणीचा प्रयोग हाऊसफुल्ल झाला. माझ्याच गावात माझ्या माणसांनी, प्रेक्षकांनी सनई चौघडे वाजवून स्वागत केलं अनआय कार्यक्रमाचे खूप कौतुकही केलं. धन्यवाद परभणीकर.” दरम्यान, या पोस्टला अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी संकर्षणच्या या खास कार्यक्रमाचे कौतुकही केले आहे.  

Tags: संकर्षण कऱ्हाडेमराठी अभिनेतामराठी मनोरंजन बातमीमराठी बातमीmarathi actormarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newssankarshan karhadesankarshan via spuha
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Saleel Kulkarni Post

'एका माकडाने काढलंय दुकान' या गाण्यावर शाहरुख खानची लेक थिरकली, सलील कुलकर्णीनी पोस्ट शेअर करत म्हणाले, "मी हसण्याच्या स्टेजला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.