शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझं खरं रुप…”, अंकिता लोखंडे व मुन्नवर फारुकीच्या नात्यात फुट, अभिनेत्री नको नको ते बोलली अन्…; म्हणाली, “तू वाईट…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 18, 2024 | 1:27 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17

"तुझं खरं रुप...", अंकिता लोखंडे व मुन्नवर फारुकीच्या नात्यात फुट, अभिनेत्री नको नको ते बोलली अन्...; म्हणाली, "तू वाईट..."

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ च्या नुकत्याच समोर आलेल्या भागात विकी जैन व मुन्नवर फारुकी यांच्यात जोरदार भांडण केलेलं पाहायला मिळालं. टॉर्चर टास्क या खेळाचा दुसरा भाग सुरु होण्यापूर्वी एका संघाने मसाले, बादल्या आणि इतर काही वस्तू लपवल्या यावरुन त्यांच्यात खूप मोठा वाद झालेला पाहायला मिळाला. यानंतर ‘बिग बॉस’ने मुन्नवर, अभिषेक, मन्नारा व अरुण यांना अर्काइव्ह रूममध्ये बोलावले. विकी, अंकिता, आयेशा व ईशा यांनी मिरची पावडर टाकून त्याचा छळ केला त्या टास्कमधील एक क्लिप त्यांना दाखवण्यात आली. आणि दुसरी क्लिप विकी व त्यांच्या टीमने सर्वकाही कसे लपवले आणि त्यांनी गोष्टी कुठे लपवल्या याबद्दल होती.

यानंतर ‘बिग बॉस’ने टीम ए ला काय करावे याचा पर्याय दिला. दरम्यान ‘बिग बॉस’ने त्यांना दोन पर्याय दिले. पहिला ‘बिग बॉस’ त्यांना सर्व रेशन परत देईल आणि त्यांना ३० मिनिटांत त्यांच्या विरोधकांचा पराभव करायचा आहे. दुसरा पर्याय, “‘टीम ए’च्या चुका दाखवत त्यांचा पराभव करुन तुम्ही फिनालेला पोहोचून दाखवा” यावेळी अंकिता व ईशाला खात्री होती की मुन्नवर व त्याची टीम दुसरा पर्याय निवडतील कारण त्यांना माहित होते की मुन्नवरची टीम त्यांना हरवू शकत नाही.

आणखी वाचा – परदेशात लेकीला पूजा करायला शिकवत आहे प्रियांका चोप्रा, अभिनेत्रीच्या संस्कारांचं कौतुक अन् फोटो व्हायरल

यानंतर ‘बिग बॉस १७’ च्या नवीन प्रोमोमध्ये अंकिता मुन्नवरला टोमणे मारताना दिसते की त्याने तिच्याशी असे का केले. ती म्हणते, कायर मुन्ना, फत्तू मुन्ना. मुन्नवर मात्र अंकिताच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि या मुद्द्यावरून त्यांच्यात भांडण होते. अंकिता मुन्नवरला म्हणते, “हे तुझं खरं रूप आहे, जेव्हा मन्नारा तुझ्यासाठी रडायची ते आज मला कळत आहे. तू वाईट माणूस आहेस”. यावर मुन्नवर हसतो आणि म्हणतो, “खूप त्रास होत आहे, होऊ दे”.

आणखी वाचा – “माझ्या माणसाकडे जायला…”, अलिकडे लग्न न टिकण्याच्या वाढत्या प्रमाणावर सिद्धार्थ चांदेकरचं भाष्य, म्हणाला, “कोणताच मुखवटा…”

अंकिता व मुन्नवर हे ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून मित्र होते. त्यांच्यात मैत्रीपूर्व असं घट्ट नातं होतं आणि अंकिता मुन्नवरला भाऊ मानायची. मात्र, टॉर्चर टास्कदरम्यान झालेल्या संघर्षानंतर मुन्नवरची बदलेली वागण्याचाही पद्धत पाहता अंकिताला आश्चर्य वाटले. आणि त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद सुरु झाला.

Tags: ankita lokhandeankita lokhande and munawar faruqui fightbigg bossbigg boss 17entertainmentmunavar faruqui
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
Next Post
Bigg Boss 17 Latest News

"असं व्हायला नको होतं", अंकिता लोखंडेची आई लेकीच्या सासूवर नाराज, खुलासा करत म्हणाली, "नात्यावर परिणाम…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.