शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सासूने जे ऐकवलं तेच नवऱ्यानेही सुनावलं, अंकिता लोखंडेचं वैवाहिक आयुष्य वादात, म्हणाला, “मुन्नवरला मिठी मारते अन्…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 5, 2024 | 5:08 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bigg boss 17 new promo ankita lokhande and Vicky jain fight because he talk with mannara chopra watch video)

सासूने जे ऐकवलं तेच नवऱ्यानेही सुनावलं, अंकिता लोखंडेचं वैवाहिक आयुष्य वादात, म्हणाला, “मुन्नवरला मिठी मारते अन्…”

‘बिग बॉस १७’शोला इतर सीझनप्रमाणेच प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. घरातील सदस्यांची भांडणं, नाती विशेष चर्चेत आली आहेत. त्यापैकी एक जोडपं आणि त्यांच्यामधील खासगी विषय सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. ते जोडपं म्हणजे अंकिता लोखंडे व विकी जैन. अंकिता व विकी यांच्या नात्यामध्ये दिवसेंदिवस दुरावा निर्माण होत आहे. दोघांमध्ये नात्याविषयी असलेला विश्वासही आता नाहीसा होत आहे. त्यांचा ‘बिग बॉस’च्या घरातील भांडणाचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंकिता–विकीमध्ये वाद होण्यामागचं कारण मन्नारा चोप्रा आहे. (Bigg Boss 17 : Ankita Lokhande And Vicky Jain Fight)

‘बिग बॉस’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये दोघंही जोरदार भांडताना दिसत आहेत. विकी मन्नाराबरोबर एकत्रित वेळ घालवतो. दरम्यान तिला विचारतो, “तू रात्री जेवली का नाही? तसेच तू दुःखी वाटत होतीस”. विकीचं हे बोलणं अंकिता लांबूनच ऐकते. तिला राग अनावर होतो आणि ती रुममधून निघून जाते. अंकिताला राग आला असल्याचं विकीला कळतं. तो हातात असलेली खाण्याचा बाऊल घेऊन तिच्या पाठी पाठी जातो.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – Video : आकर्षक इंटेरियर, मोठा हॉल अन्…; माधुरी पवारने खरेदी केलं स्वप्नातलं घर, व्हिडीओमध्ये कुटुंबियांचा दिसला साधेपणा

अंकिता विकीजवळ जाऊन एका टेबलवर बसते. त्याचदरम्यान म्हणते, “तू मन्नाराबरोबर बसलास तरी मला काही त्रास नाही”. यावर विकीचाही राग अनावर होतो. तो म्हणतो, “तू दिवसभर मुन्नाबरोबर बसून जेवते, चहा पिते. तेव्हा मी तुला काहीच बोलत नाही”. अंकिता यावर उत्तर देत म्हणते की, “मी संपूर्ण दिवस त्याच्याबरोबरच बसून राहत नाही. तू अधिक वेळ मन्नाराबरोबरच असतो”. दोघांमध्ये जोरदार भांडण होतं.

आणखी वाचा – ‘दादा एक गुडन्यूज’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याची लगीनघाई, मेहंदी-संगीत, ग्रहमख अन् पुण्याच्या ढेपे वाड्यामध्ये झालं व्याही भोजन

यावर उत्तर देत विकी म्हणतो, “मी तिच्याजवळ जाणार. त्यामध्ये काय चुकीचं आहे” शिवाय विकी त्याची आई ‘बिग बॉस’मध्ये येऊन अंकितासाठी जे बोलते तेच वाक्य पुन्हा बोलतो. तो म्हणतो, “मुन्नवर जेव्हा दुःखी असतो तेव्हा तू त्याला मिठी मारते. त्याचा हात पकडते. तू करते तेव्हा मी तुला सूट देतो. तू जर मुन्नवरशी बोलणार नसशील तर मी मन्नाराबरोबर बोलणार नाही.” अंकिता व विकीच्या वादामाध्ये प्रेक्षकांनी विकीला पाठिंबा दिला आहे.

Tags: अंकिता लोखंडेबिग बॉस 17बिग बॉस 17 प्रोमोविक्की जैनanikta vicky arguementankita lokhandeankita lokhande bigg boss 17ankita lokhande vicky jain fightbigg boss 17Bigg boss 17 promovicky jain
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
actress urvashi dholakia gets hospitalized son share video of her mother on social media suffer from tumour

सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी ढोलकिया गंभीर आजार, रुग्णालयामध्ये दाखल, शस्त्रक्रियाही झाली अन्…; म्हणाली, “डिसेंबरमध्ये मला…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.