Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ मधील प्रत्येक स्पर्धक हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिला. मुन्नवर फारुकी त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे विशेष चर्चेत आला. ‘बिग बॉस’मध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड आयशा खानने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. नाझिला सिताशीला एकाचवेळी डेट केल्याचा आरोपही तिने मुन्नवरवर केला होता. त्यानंतर मुन्नवरने शोमध्ये नाझिलावर निशाणा साधला. यावेळी बोलताना तो म्हणाला की, नाझिलाशी संबंध तोडण्यास सक्षम असे काही कारण नाही कारण ती त्याला धमक्या देत असे. या आरोपानंतर आता नाझिलाने केलेली पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
मुन्नवर फारुकीने स्वतःची बाजू सांभाळत म्हटलं की, तो नाझिलाबरोबर आहे कारण तिने त्याला धमकी दिली होती की जर सोडून गेला तर ती त्याचे आयुष्य उध्वस्त करेल. नाझिलाने मुन्नवरच्या बहिणीबद्दल वाईट बोलल्याचाही खुलासा केला होता, म्हणून त्याने नाझिलाशी संबंध तोडले” असल्याचं सांगितलं.

आता नझिलाने यावर प्रतिक्रिया देत एक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियाची मदत घेत तिने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत म्हटलं की, “स्वत:चे संरक्षण करण्यासाठी लोक खोटं बोलतात ही लाजिरवाणी बाब आहे”. नाझिलाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र, नाझिलाने केलेली पोस्ट ही मुनव्वरसाठीची असल्याचं तिने म्हटलं.
‘बिग बॉस’च्या मागील भागात आयशाने मुन्नवरवर गंभीर आरोप केले होते. तिने सांगितले की, “मुन्नवर केवळ तिला व नाझिलालाच नाही तर इतरही काही मुलींना डेट करत होता. कुठल्यातरी मुलीला मेसेज करुन तो बाहेर जात असे. म्युझिक व्हिडीओच्या बहाण्याने तो भेटायचा. त्याच्या आयुष्यात २-३ मुली होत्या. तो नाझिलाचीही फसवणूक करत होता”असं ती म्हणाली. ‘बिग बॉस’च्या घरात सध्या फॅमिली वीक सुरु आहे. यावेळी आता मुन्नवरची बहीण ‘बिग बॉस’च्या घरी येताना दिसणार आहे.