Bigg Boss 17 Upadte : ‘बिग बॉस’चे यंदाचे १७ वे पर्व बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आले. पहिल्याच दिवसापासून हे पर्व चांगले गाजत आहे आणि बिग बॉसच्या घरात सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. नुकतीच या शोमध्ये विकी व अंकिताची आई येणार आहेत. अंतिम सोहळ्याआधी या शोमध्ये ‘फॅमिली स्पेशल’ आठवड्यामध्ये अंकिता व विकीची आई ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहेत. (Bigg Boss 17 News)
या ‘फॅमिली स्पेशल’ आठवड्याचे शूटिंग पार पडले असून अंकिता व विकीच्या आई या शोमधून परतल्या आहेत. दरम्यान, विकीची आई रंजना जैन यांनी अनेक वाहिन्यांना मुलाखती दिल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विकीने अंकिता लोखंडे ही त्यासाठी एक गुंतवणूक असल्याचे म्हटले होते. अंकिताबरोबर लग्न करणे ही माझ्यासाठी केवळ एक गुंतवणूक आहे असे मत त्याने मांडले होते. ईशाने शोमध्ये याचा खुलासा केला होता. त्यानंतर अंकितानेही विकीला याबाबत विचारणा केली. दरम्यान, विकीच्या या वक्तव्यावर आता त्याच्या आईनेदेखील प्रतिक्रिया दिली आहे.
विकीची आईने यावर प्रतिक्रिया देत असे म्हटले आहे की, “एखाद्या अभिनेत्रीला मिळवायचं असेल, तिच्याशी लग्न करायचं असेल तर मेहनत ही करावीच लागते. ते सहजासहजी येत नाही आणि यासाठी गुंतवणूक करावीच लागते. गुंतवणूक केल्यावरच ती गोष्ट आपल्याला मिळते आणि त्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. तेव्हाच सगळे नखरे पूर्ण होतात.”
दरम्यान, विकीच्या आईने दिलेल्या मुलाखतीत तिने अंकितावर अनेक आरोप करत निशाणा साधला आहे. बिग् बॉसच्या घरातील विकीबरोबरच्या तिच्या वागणुकीवरुनही तिने अंकिताला सुनावले असल्याचे पाहायला मिळाले. पण यामुळे आता त्या टीकेच्या धनी झाल्या आहेत. अनेकांनी त्यांच्यावर व त्यांनी केलेल्या व्यक्तव्यांवर नाराजीही व्यक्त केली असल्याचे पाहायला मिळत आहे.