शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : क्रांती रेडकरच्या लेकी सादर करणार श्रीकृष्ण जन्माची कथा, मित्र-मैत्रिणींसह रंगणार खेळ, पाहा हा धमाल व्हिडीओ

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 11, 2024 | 11:32 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Kranti redkar’s daughters will play shri Krishna birth story new video viral on Instagram

Video : क्रांती रेडकरच्या लेकी सादर करणार श्रीकृष्ण जन्माची कथा, मित्र-मैत्रिणींसह रंगणार खेळ, पाहा हा धमाल व्हिडीओ

हल्ली सोशल मीडिया हेही मनोरंजनाचे एक साधन झाले आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकजण वेगळ्या प्रकारचा कंटेट तयार करतात. मराठीतील अनेक कलाकारही सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनयाव्यतिरिक्त वेगळा कंटेट तयार करत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. अशा अनेक कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. क्रांती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती तिच्या लेकींचे मजेशीर व्हिडीओही पोस्ट करत असते.  (Kranti Redkar On Instagram)

क्रांतीच्या लेकींच्या अनेक करामती ती सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असते आणि तिच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील उत्तम प्रतिसाद मिळत असतो. अशातच क्रांतीने नुकताच एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये क्रांतीच्या लेकींनी श्रीकृष्ण जन्माची कथा सांगितली आहे.  क्रांतीने शेअर केलेल्या आपल्या लेकींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “तेव्हाच नखरे पूर्ण होतात…”, अंकिता लोखंडेवर पैसे खर्च करण्यावर विकी जैनचं वादग्रस्त वक्तव्य, सासूचाही लेकाला पाठिंबा, म्हणाल्या “गुंतवणूक केल्यावरच…”

हा खास व्हिडीओ शेअर करत क्रांतीने असे म्हटले आहे की, “आमच्या घरी छबील व गोदोचे मित्र-मैत्रिणी शनिवारी खेळायला येणार आहेत आणि ही मुलं श्रीकृष्ण-गोविंद हा सुंदर खेळ खेळणार आहेत. श्रीकृष्ण-गोविंद म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म ही मुलं रिक्रिएट करणार आहेत. यांच्यातील एक मुलगी यशोदा, एक देवकी, वासुदेव, एक नंद बनेल… यानंतर कृष्णजन्म होईल. पुढे बाळकृष्णाचं संगोपन माता यशोदा करेल. असं संपूर्ण नियोजन या मुलांनी करून ठेवलेलं आहे.” यादरम्यान, आईच्या मागे या व्हिडीओत छबीलदेखील श्रीकृष्ण जन्माची संपूर्ण कथा सांगताना पाहायला मिळत आहे. तसेच यापुढे व्हिडीओमध्ये तिने असे म्हटले आहे की, “शनिवारच्या या खेळात छबील देवकी, तर गोदो यशोदा बनणार आहे. यांच्याबरोबर या दोघींच्या सगळ्या मैत्रिणी सहभागी होतील. त्यामुळे आमच्या घराचं सुंदर असं नंदनवन तयार झालं आहे.” 

आणखी वाचा – Ira Khan-Nupur Shikhare Wedding : आयरा खान व नुपूर शिखरे यांचा विवाहसोहळा संपन्न, ख्रिश्चन पद्धतीने पार पडले लग्न, लूकनेही वेधलं लक्ष

या व्हिडीओखाली तिने व्हिडीओला साजेसं असं कॅप्शनदेखील लिहिलं आहे. यात तिने असं म्हटले आहे की, “आपल्या मुलांना या जुन्या गोष्टी व कथा समजावून सांगणं हे आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. हे त्यांना सर्जनशील होण्यास मदत करते. आपल्या भारतमातेच्या संस्कृतीची त्यांना ओळख करून दिली पाहिजे. आणि हे फक्त देव-देवीपुरते मर्यादित नाही तर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दलही त्यांना सांगितले पाहिजे. यामुळे भविष्यात त्यांना खरा मार्गदर्शक शोधण्यात मदत होईल.” दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे तुफान प्रतिसाद दिला आहे. तसेच क्रांतीच्या लेकींचे कौतुकही केले आहे.   

Tags: kranti redkarmarathi actressmarathi entertainment newsMarathi newsक्रांती रेडकरमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
Next Post
Actor aamir khan emotional in daughter Ira Khan-Nupur Shikhare Wedding video viral on social media

Video : लेकीचं लग्न सुरु असताना आमिर खानच्या डोळ्यात पाणी, आयरा खानला पाहताना गहिवरुन आलं अन्…; भावुक व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.