शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्या ‘त्या’ आजोबांकडून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने संपूर्ण भाजीच विकत घेतली अन्…; म्हणाली, “मनात राम होता आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 23, 2024 | 12:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Radhika Deshpande Post

Video : बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्या 'त्या' आजोबांकडून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने संपूर्ण भाजीच विकत घेतली अन्…; म्हणाली, "मनात राम होता आणि…"

मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे हिने आजवर अनेक मराठी मालिकांमधून तसेच नाटकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. राधिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. याशिवाय अनेक घडामोडींवर ती पोस्टमधून व्यक्त होताना दिसते. यामुळे बरेचदा अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना ही करावा लागला आहे. अशातच अभिनेत्री सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. काल (२२ जानेवारी) रोजी संपूर्ण भारतात राम प्रतिष्ठापनेचा दिवस अगदी थाटामाटात साजरा करण्यात आला. (Radhika Deshpande Post)

अशातच हा दिवस राधिका देशपांडे हिने वेगळ्याच भक्तिभावाने साजरा केला. याबाबतची एक खास पोस्ट अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केली आहे. बाजारपेठेतील एका भाजी विक्रेत्याचा एक व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शन देत लिहिलं आहे की, “दिवस मोठा होता. काल प्रभू श्री राम आले. सर्वत्र आनंद ओसंडून वाहत होता. एका कोपऱ्यात हे आजोबा बेंबीच्या देठापासून चाळीस रुपयाला एक जुडी विकायचा प्रयत्न करत होते. त्यांचा आवाज काही सेकंद माझ्या कानात घुमत राहिला. एकीकडे नाटकाच्या प्रयोगाची पहिली घंटा वाजली होती. पण हे काम मला करायचं होतं. आजच. कोणतं? व्हिडिओ बघा” असं म्हटलं.

आणखी वाचा – सुंदर रांगोळी, पारंपरिक सजावट अन्…; प्रवीण तरडेंनी केली श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा, पत्नीने व्हिडीओ केला शेअर, म्हणाली, “कलियुगातील…”

View this post on Instagram

A post shared by Radhika Deshpande (@radhika_deshpande)

यापुढे अभिनेत्रीने असं लिहिलं आहे की, “माझी आई म्हणते, “काही ठिकाणी भाव करायचा नाही. तर काही ठिकाणी भाव केल्याशिवाय काहीही विकत घ्यायचं नाही. संपूर्ण दुकान विकत घेतलं न भाव करता. पोटासाठी काम करणारे आजोबा आज पोटभर नक्की जेवतील याची सोय केली. दिवस रामाचा. काम रामाचं. एखाद्या नाटक सिनेमातला प्रसंग आठवला “महाराज, अभिनंदन! राणी सरकारला मुलगा झाला. मग राजा कसलाही विचार न करता त्याच्या गळ्यातली रत्नजडित माळ सुईणीला देतो. तसचं काहीसं. आनंद तर मलाही झाला होता प्रचंड. मी ही राणी सरकार असल्यासारखा आनंद लुटला. दिसेल त्याला कोथिंबीर वाटत सुटले. नाटकातल्या कलाकारांनी माझ्या या कामाचे स्वागतच केले. आणि आनंदाने कोथिंबीर घरी नेली”.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : आयेशा, ईशानंतर विकी जैनचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपणार?, नवीन प्रोमोमुळे चर्चांना उधाण

शेवटी अभिनेत्रीने तिच्या लेकीला सल्ला देत म्हटलं की, “आईने जे सांगितले ते माझ्या मुलीला मी सांगितलेच आहे पण त्यात एक जुडी आणखीन जोडीन. “अंतरा, आयुष्यात काही दिवस असे येतील त्या दिवशी भाव करायचा नाही. आणि चांगले काम केले हे सांगताना भाव खायचा नाही”. त्या आजोबांच्या घरी दिवाळी आली की नाही माहित नाही पण मी मात्र दिवाळी अशी साजरी केली. कारण दिवस मोठा होता. आणि मन मोठं का छोटं, ते कसं मोजता येईल? मनात राम होता आणि तो मनात घर करुन राहिला”. राधिकाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. “त्या आजोबांचं निर्मळ हास्य ही तुझी कमाई” असं म्हणत समीर चौघुलेने राधिकाच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

Tags: entertainmentmarathi actressradhika deshpande instagramradhika deshpande newsradhika deshpande post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

"'बिग बॉस'ने माझी दोन घरं उद्ध्वस्त केली", भर पत्रकार परिषदेत मुन्नवर फारुकीचे आरोप, म्हणाला, "या शोमध्ये…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.