मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : आयरा खान व नुपूर शिखरे यांचा विवाहसोहळा संपन्न, ख्रिश्चन पद्धतीने पार पडले लग्न, लूकनेही वेधलं लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 11, 2024 | 9:43 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Nupur Shikhare and Ira Khan Wedding Marathi News

आयरा खान-नुपूर शिखरे लग्न

Nupur Shikhare and Ira Khan Marriage : गेले काही दिवस बॉलिवूड विश्वात एकाच लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे आणि ते लग्न म्हणजे आयरा खान व नुपूर शिखरे या जोडीचं. मुंबईमधील ताज एंडस लँड या हॉटेलमध्ये या दोघांचे कायदेशीर पद्धतीने लग्न पार पडले. साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला असून आयरा-नुपूरच्या जवळच्या नातेवाईकांच्या व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा संपन्न झाला. त्यानंतर काल (१० जानेवारी) रोजी हे दोघे पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी अगदी थाटामाटात आणि ख्रिश्चन पद्धतीने एकमेकांशी लग्न केलं. उदयपूरमध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला असून दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो व व्हिडीओमध्ये आयराने पांढरा शुभ्र गाऊन परिधान केला होता. तर त्यावर साजेसा साजशृंगार आणि लाइट मेकअप असलेला लूक केला होता. तर नुपूर शिखरे हा बेज रंगाच्या फॉर्मल सूटमध्ये खूपच डॅशिंग दिसत होता. आयरा-नुपूर एकमेकांचा हात पकडून लग्नासाठी येत असतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, त्यांच्या एन्ट्रीला उपस्थित मंडळींनी दोघांवरही फुलांचा वर्षाव केला. यावेळी आपल्या लाडक्या लेकीला वधूच्या वेषात पाहून आमिर खानही भावूक झाला.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आणखी वाचा – लग्नानंतर सुरुची अडारकर व पियुष रानडेची पहिली ट्रिप, अभिनेत्रीने शेअर केले खास क्षण, म्हणाली, “पुढील दोन दिवसांसाठी…”

आयराने नुपूरबरोबर ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केलं आहे. आयरा खान व नुपूर शिखरे यांनी लग्नबंधनात अडकल्यानंतर डान्स करत उपस्थित सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. व्हायरल होत असलेल्या फोटो व व्हिडिओद्वारे नेटकऱ्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आयरा-नुपूरने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी त्यांना शुभेच्छा देत आहेत. तर दुसरीकडे काही नेटकरी मंडळी त्यांना ट्रोलही करत आहेत.

आणखी वाचा – “नशिबाचा खेळ असा की…”, शेवटच्या दिवसांमध्ये हार्दिक जोशीने वहिनीला ‘ते’ वचन दिलं अन्…; रडत म्हणाला, “माझ्या भावाची…”

दरम्यान, आयरा-नुपूर शिखरे यांचं लग्न पार पडल्यानंतर आता जियो वर्ल्ड सेंटरमध्ये त्यांचे ग्रँड रिसेप्शन पार पडणार आहे. या ग्रँड रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. येत्या १३ जानेवारी रोजी त्यांचं हे रिसेप्शन होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Tags: अमीर खान ताज्या बातम्याआयरा खान-नुपूर शिखरे हळदीआयरा खान-नुपूर शिखरे लग्न बातम्याआयरा खान-नुपूर शिखरे लग्नाचे फोटोआयरा खान-नुपूर शिखरे लग्नाच्या बातम्याआयरा खान-नुपूर शिखरे वेडिंगकिरण राव बातम्याकोण आहे नुपूर शिखरेरीना दत्त बातम्याबॉलिवूड सेलिब्रिटी लग्नाच्या मराठी बातम्याAmir Khan Latest Marathi NewsBollywood Celebrity Wedding Marathi NewsIra Khan-Nupur Shikhare HaldiIra Khan-Nupur Shikhare Marriage Marathi NewsIra Khan-Nupur Shikhare WeddingIra Khan-Nupur Shikhare Wedding Marathi NewsIra Khan-Nupur Shikhare Wedding PicturesIra Khan-Nupur Shikhare Wedding Videos PhotosKiran Rao Marathi NewsReena Dutt Marathi NewsWho is Nupur Shikhare
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Samir Choughule Fan Moment

चाहत्याने त्याच्या घरामधील भिंतीवर लावला समीर चौघुलेंचा फोटो, ते दृश्य पाहून अभिनेता भावुक, म्हणाले, "माझ्यासाठी ही अत्यंत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.