शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “तेव्हाच नखरे पूर्ण होतात…”, अंकिता लोखंडेवर पैसे खर्च करण्यावर विकी जैनचं वादग्रस्त वक्तव्य, सासूचाही लेकाला पाठिंबा, म्हणाल्या “गुंतवणूक केल्यावरच…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 11, 2024 | 10:45 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bigg boss 17 : mother's reaction on vicky jain’s statement of marrying ankita lokhande is just an investment

Bigg Boss 17 : "तेव्हाच नखरे पूर्ण होतात...", अंकिता लोखंडेवर पैसे खर्च करण्यावर विकी जैनचं वादग्रस्त वक्तव्य, सासूचाही लेकाला पाठिंबा, म्हणाल्या "गुंतवणूक केल्यावरच..."

Bigg Boss 17 Upadte : ‘बिग बॉस’चे यंदाचे १७ वे पर्व बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आले. पहिल्याच दिवसापासून हे पर्व चांगले गाजत आहे आणि बिग बॉसच्या घरात सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. नुकतीच या शोमध्ये विकी व अंकिताची आई येणार आहेत. अंतिम सोहळ्याआधी या शोमध्ये ‘फॅमिली स्पेशल’ आठवड्यामध्ये अंकिता व विकीची आई ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहेत.  (Bigg Boss 17 News)

या ‘फॅमिली स्पेशल’ आठवड्याचे शूटिंग पार पडले असून अंकिता व विकीच्या आई या शोमधून परतल्या आहेत. दरम्यान, विकीची आई रंजना जैन यांनी अनेक वाहिन्यांना मुलाखती दिल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विकीने अंकिता लोखंडे ही त्यासाठी एक गुंतवणूक असल्याचे म्हटले होते. अंकिताबरोबर लग्न करणे ही माझ्यासाठी केवळ एक गुंतवणूक आहे असे मत त्याने मांडले होते. ईशाने शोमध्ये याचा खुलासा केला होता. त्यानंतर अंकितानेही विकीला याबाबत विचारणा केली. दरम्यान, विकीच्या या वक्तव्यावर आता त्याच्या आईनेदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – चाहत्याने त्याच्या घरामधील भिंतीवर लावला समीर चौघुलेंचा फोटो, ते दृश्य पाहून अभिनेता भावुक, म्हणाले, “माझ्यासाठी ही अत्यंत…”

विकीची आईने यावर प्रतिक्रिया देत असे म्हटले आहे की, “एखाद्या अभिनेत्रीला मिळवायचं असेल, तिच्याशी लग्न करायचं असेल तर मेहनत ही करावीच लागते. ते सहजासहजी येत नाही आणि यासाठी गुंतवणूक करावीच लागते. गुंतवणूक केल्यावरच ती गोष्ट आपल्याला मिळते आणि त्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. तेव्हाच सगळे नखरे पूर्ण होतात.”

आणखी वाचा – Ira Khan-Nupur Shikhare Wedding : आयरा खान व नुपूर शिखरे यांचा विवाहसोहळा संपन्न, ख्रिश्चन पद्धतीने पार पडले लग्न, लूकनेही वेधलं लक्ष

दरम्यान, विकीच्या आईने दिलेल्या मुलाखतीत तिने अंकितावर अनेक आरोप करत निशाणा साधला आहे. बिग् बॉसच्या घरातील विकीबरोबरच्या तिच्या वागणुकीवरुनही तिने अंकिताला सुनावले असल्याचे पाहायला मिळाले. पण यामुळे आता त्या टीकेच्या धनी झाल्या आहेत. अनेकांनी त्यांच्यावर व त्यांनी केलेल्या व्यक्तव्यांवर नाराजीही व्यक्त केली असल्याचे पाहायला मिळत आहे.     

Tags: ankita lokhandebigg bossbigg boss 17bigg boss 17 newsbigg boss newsBollywood entertainmentBollywood entertainment newsentertainment newsvicky jainvicky jain motherअंकिता लोखंडेबिग बॉसबिग बॉस १७बिग बॉस १७ बातमीबिग बॉस बातमीविकी जैनविकी जैन आई
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : "लोक खोटं बोलतात आणि…", गंभीर आरोपांनंतर मुन्नवर फारुकीच्या एक्स गर्लफ्रेंडची पोस्ट, म्हणाली, "लाजिरवाणी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.