Bigg Boss Updates : ‘बिग बॉस’चे यंदाचे १७वे पर्व चांगलेच गाजले. ‘बिग बॉस १७’ हा शो आता अंतिम टप्प्यात अल असून या शोचा प्रवास आता महाअंतिम सोहळ्याच्या दिशेने सुरु झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये शनिवारी (२० जानेवारी) रोजी या घरातील आयेशा खानचा प्रवास संपला. अशातच काल रविवारी (२१ जानेवारी) रोजी ईशा मालवियाचा प्रवासदेखील संपला आहे. तिच्या जाण्याने अंकिता लोखंडे, विक्की जैन भावुक झाल्याचे दिसले. याशिवाय ईशाचा एक्स-बॉयफ्रेंड अभिषेक कुमारदेखील ढसाढसा रडतानाचे पाहायला मिळाले.
‘बिग बॉस १७’च्या सुरुवातीला ईशा मालविया व अभिषेक कुमारची चांगली मैत्री पाहायला मिळाली. पण इशाचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेलच्या एण्ट्रीनंतर इशा व अभिषेक यांच्यात सतत वाद होत असल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये दोघंही एकमेकांची माफी मागताना पाहायला मिळाले. काल, या पर्वाच्या शेवटच्या वीकेण्डच्या वारला सलमान खानने इशा या घरातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. यावेळी ईशाला निरोप देताना अंकिता लोखंडेसह विक्की जैन भावुक झाले. घरातून बाहेर पडत असलेल्या स्पर्धकाचे नाव इशा असल्याचं ऐकताच त्याला अश्रू अनावर झाले.
#IshaMalviya & #AbhishekKumar final good bye. #BiggBoss17 pic.twitter.com/4oyh9K6lgI
— Khabri ???? (@real_khabri_1) January 21, 2024
यावेळी ईशाला निरोप देताना अभिषेक म्हणाला की, “तू या घरातून बाहेर पडावी अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. तुला असं वाटतं होतं. पण माझ्या मनात तसं काही नव्हतं.” यानंतर ईशा म्हणाली, “जे काही झालं त्या सगळ्यासाठी मी माफी मागते.” तेव्हा अभिषेकनेदेखील ईशाची माफी मागितली. पुढे ईशा त्याला म्हणाली, “आता आपला विषय इथेच संपत आहे. मी तुझ्याबद्दल वाईट बोलणार नाही. तू ही बोलू नकोस. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. यापुढे खूप चांगला खेळ.”
हेही वाचा – अयोध्येत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी, पारंपरिक लुकने वेधले लक्ष, फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, ईशाच्या जाण्याने अभिषेकला खूपच दु:ख झाल्याचे पाहायला मिळाले. ईशा गेल्यानंतर अभिषेक वॉशरूममध्ये जाऊन खूप रडला. बराच काळ स्वतःला वॉशरूममध्ये बंद करून अभिषेक जोरजोरात रडत इशा मला माफ कर असं म्हणत होता. त्यावेळेस मुनव्वरने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याला काही वेळ एकट्यालाच राहायचं आहे असं त्याने मुन्नवरला सांगितलं.