बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यात काही…” स्पृहा जोशीच्या ब्लाऊजवरील ‘त्या’ फोटोवरुन झालेल्या गदारोळावर अभिनेत्रीने आता केला खुलासा, म्हणाली “मला सतत…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 22, 2024 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Marathi actress spruha joshi react on halter neck backless blouse controversy see the details

“त्यात काही..." स्पृहा जोशीच्या ब्लाऊजवरील 'त्या' फोटोवरुन झालेल्या गदारोळावर अभिनेत्रीने आता केला खुलासा, म्हणाली “मला सतत...”

‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. आपल्या अनोख्या व वेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी स्पृहाने कायमच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. स्पृहा ही केवळ एक अभिनेत्रीचे नव्हे तर एक उत्तम कवयित्रीदेखील आहे आणि एक उत्तम संवादकसुद्धा. स्पृहाच्या अभिनयासह कवितांना चाहत्यांकडून कायमच प्रोत्साहन मिळत आले आहे. काही दिवसांपूर्वीच आलेल्या ‘लोकमान्य’ या मालिकेतील तिच्या भूमिकेचेही चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिच्यासह अभिनेता क्षितिश दातेही होता.

चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकाराची एखादी गोष्ट आवडत असल्यास ते त्यांची पसंती दर्शवतात. मात्र आपल्या आवडत्या कलाकाराची एखादी गोष्ट खटकत असेल तर ते त्याबाबतदेखील व्यक्त होत असतात. असंच काहीसं स्पृहाच्या बाबतीत काही वर्षांपूर्वी झालं होतं. काही वर्षांपूर्वी स्पृहाने तिच्या सोशल मीडियावर बॅकलेस ब्लाऊज घातलेला एक फोटो पोस्ट केला होता आणि त्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. यावर स्वत: अभिनेत्रीने तिचे मत मांडले आहे.

View this post on Instagram

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

नुकतंच ‘आरपार’ या युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पृहाने अनेक विषयांवर तिचं मत मांडलं. यावेळी तिला “काही वर्षांपूर्वी तू एक फोटोशूट केलं होतं बॅकलेस वाटेल असा तो ब्लाऊज होता. त्या फोटोमुळे तेव्हा प्रचंड गदारोळ झाला होता याविषयी तुला काय वाटतं? म्हणजे तो फोटो काढावा का वाटला आणि त्यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत स्पृहाने असे म्हटले की, “ही साधारण पाच ते सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुळात जेव्हा मी फोटोशूट केलं, तेव्हा त्यात फार काही रिव्हिलिंग नव्हतं. त्यात मी हॉल्टरनेक ब्लाऊज परिधान केला होता. पहिली गोष्ट म्हणजे, हॉल्टरनेक ब्लाऊज आतापर्यंत कोणी घातलेला नाही, अशातला काही भाग नव्हता. म्हणजे असं काही नाही की, आपण आपल्या आसपास हॉल्टरनेक ब्लाऊज घातलेलं कुणी बघितलेलंच नाही.”

हेही वाचा – “इंडस्ट्रीत खूप काम केल्यामुळे…”, स्पृहा जोशी ऑडिशनला जाण्यासाठी द्यायची नकार, स्वतःच खुलासा करत म्हणाली, “माझा मुद्दा…”

यापुढे ती म्हणाली की, “दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे ती म्हणजे, एखादी व्यक्ती जर एका विशिष्ट पद्धतीची भूमिका करत असेल, तर ती व्यक्ती खऱ्या आयुष्यातही तशीच आहे असं अजिबात नसतं किंवा ती व्यक्ती तसं असण्याचा अट्टाहास करणेही योग्य नाही. यामुळे मला कामच करता येणार नाही. कारण, सतत मला अठराशेच्या शतकातील भूमिका कोणीच देणार नाहीत किंवा तसे प्रोजेक्ट्सही बनणार नाहीत.”

हेही वाचा – अयोध्येत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी, पारंपरिक लुकने वेधले लक्ष, फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

यापुढे आपल्या भूमिकांबद्दल स्पृहाने असं म्हटलं की, “मी सतत त्याच त्याच भूमिका करत राहिले, तर प्रेक्षक आणि कालांतराने मी स्वत:ही कंटाळेन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, स्वत:चा वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेण्यासाठी आणि काहीतरी नवनवीन करण्यासाठीच आपण अभिनयाच्या क्षेत्रात येतो. वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपल्याला परकाया प्रवेश करता यावा हे माझं अभिनय क्षेत्रात येण्याचं खरं कारण आहे.”

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainment newsMarathi newsspruha joshiमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीस्पृहा जोशी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Next Post
Abhishek kumar crying fake and says he did for footage isha malviya said after eviction from bigg boss 17

Bigg Boss 17 : “तो दिखाव्यासाठी...”, ‘बिग बॉस’मधून बाहेर येताच ईशा मालवीयाचा अभिषेक कुमारवर निशाणा, म्हणाली, “सहानुभूती...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.