सोमवार, जून 2, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : आयेशा खाननंतर ‘हा’ स्पर्धकही पडला घराबाहेर, अंकिता-विकी झाले भावुक, अभिषेक कुमारलाही अश्रु अनावर   

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 22, 2024 | 2:19 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg boss 17 isha malviya out form the house Abhishek kumar cried and apologized her see the details

Bigg Boss 17 : आयेशा खाननंतर ‘हा’ स्पर्धकही पडला घराबाहेर, अंकिता-विकी झाले भावुक, अभिषेक कुमारलाही अश्रु अनावर   

Bigg Boss Updates : ‘बिग बॉस’चे यंदाचे १७वे पर्व चांगलेच गाजले. ‘बिग बॉस १७’ हा शो आता अंतिम टप्प्यात अल असून या शोचा प्रवास आता महाअंतिम सोहळ्याच्या दिशेने सुरु झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये शनिवारी (२० जानेवारी) रोजी या घरातील आयेशा खानचा प्रवास संपला. अशातच काल रविवारी (२१ जानेवारी) रोजी ईशा मालवियाचा प्रवासदेखील संपला आहे. तिच्या जाण्याने अंकिता लोखंडे, विक्की जैन भावुक झाल्याचे दिसले. याशिवाय ईशाचा एक्स-बॉयफ्रेंड अभिषेक कुमारदेखील ढसाढसा रडतानाचे पाहायला मिळाले.

‘बिग बॉस १७’च्या सुरुवातीला ईशा मालविया व अभिषेक कुमारची चांगली मैत्री पाहायला मिळाली. पण इशाचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेलच्या एण्ट्रीनंतर इशा व अभिषेक यांच्यात सतत वाद होत असल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये दोघंही एकमेकांची माफी मागताना पाहायला मिळाले. काल, या पर्वाच्या शेवटच्या वीकेण्डच्या वारला सलमान खानने इशा या घरातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. यावेळी ईशाला निरोप देताना अंकिता लोखंडेसह विक्की जैन भावुक झाले. घरातून बाहेर पडत असलेल्या स्पर्धकाचे नाव इशा असल्याचं ऐकताच त्याला अश्रू अनावर झाले.

#IshaMalviya & #AbhishekKumar final good bye. #BiggBoss17 pic.twitter.com/4oyh9K6lgI

— Khabri ???? (@real_khabri_1) January 21, 2024

हेही वाचा – “इंडस्ट्रीत खूप काम केल्यामुळे…”, स्पृहा जोशी ऑडिशनला जाण्यासाठी द्यायची नकार, स्वतःच खुलासा करत म्हणाली, “माझा मुद्दा…”

यावेळी ईशाला निरोप देताना अभिषेक म्हणाला की, “तू या घरातून बाहेर पडावी अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. तुला असं वाटतं होतं. पण माझ्या मनात तसं काही नव्हतं.” यानंतर ईशा म्हणाली, “जे काही झालं त्या सगळ्यासाठी मी माफी मागते.” तेव्हा अभिषेकनेदेखील ईशाची माफी मागितली. पुढे ईशा त्याला म्हणाली, “आता आपला विषय इथेच संपत आहे. मी तुझ्याबद्दल वाईट बोलणार नाही. तू ही बोलू नकोस. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. यापुढे खूप चांगला खेळ.”

हेही वाचा – अयोध्येत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी, पारंपरिक लुकने वेधले लक्ष, फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, ईशाच्या जाण्याने अभिषेकला खूपच दु:ख झाल्याचे पाहायला मिळाले. ईशा गेल्यानंतर अभिषेक वॉशरूममध्ये जाऊन खूप रडला. बराच काळ स्वतःला वॉशरूममध्ये बंद करून अभिषेक जोरजोरात रडत इशा मला माफ कर असं म्हणत होता. त्यावेळेस मुनव्वरने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याला काही वेळ एकट्यालाच राहायचं आहे असं त्याने मुन्नवरला सांगितलं.

Tags: Abhishek kumarbigg bossbigg boss 17bigg boss 17 newsBollywood entertainmentBollywood entertainment newsentertainment newsisha malviyaअभिषेक कुमारईशा मालवियबिग बॉसबिग बॉस १७बिग बॉस १७ बातमीबॉलिवूड मनोरंजनबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

seema kapoor torchered by own mother
Entertainment

आईकडून मारहाण, टॉर्चर अन् हाल; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला वाईट काळ, जन्मदातीच वैरी ठरली तेव्हा…

जून 2, 2025 | 7:00 pm
Premachi Goshta fame Swarda Thigales car accident
Entertainment

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

जून 2, 2025 | 5:58 pm
Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Next Post
Marathi actress spruha joshi react on halter neck backless blouse controversy see the details

“त्यात काही..." स्पृहा जोशीच्या ब्लाऊजवरील 'त्या' फोटोवरुन झालेल्या गदारोळावर अभिनेत्रीने आता केला खुलासा, म्हणाली “मला सतत...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.