गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गरोदर असल्याच्या चर्चांना ऐश्वर्या शर्माने दिला पूर्णविराम, पोस्ट शेअर करत म्हणाली, “तिसऱ्यांदा ओरडून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 20, 2024 | 9:23 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aishwarya Sharma On Pregnancy

गरोदर असल्याच्या चर्चांना ऐश्वर्या शर्माने दिला पूर्णविराम, पोस्ट शेअर करत म्हणाली, "तिसऱ्यांदा ओरडून…"

मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. रिॲलिटी शो ‘बिग बॉस १७’ मुळे ही अभिनेत्री अलीकडे चर्चेत होती. याशिवाय ऐश्वर्या एका वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. ‘डान्स दिवाने ४’च्या मंचावर ऐश्वर्याला चक्कर आल्याने, अनेकांनी ती गरोदर असल्याच्या अफवा पसरवल्या होत्या. मात्र, आता खुद्द ऐश्वर्यानेच या अफवांवर मौन सोडले आहे आणि या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (Aishwarya Sharma On Pregnancy)

ऐश्वर्या शर्मा भट्ट ‘गम है किसी के प्यार में’ मालिकेच्या सेटवर नील भट्टला भेटली. त्यानंतर दोघे प्रेमात पडले आणि २०२१ मध्ये त्यांनी लग्न केले. ३० नोव्हेंबर रोजी उज्जैनमध्ये त्यांचे लग्न झाले. ही जोडी ‘बिग बॉस १७’ मध्ये एकत्र पाहायला मिळाली होती. या कार्यक्रमात ऐश्वर्याच्या वागण्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. नीलबरोबरचे तिचे वागणे प्रेक्षकांना विशेष आवडले नाही. त्यामुळे अनेकदा अभिनेत्री ट्रोलिंगच्या कचाट्यात सापडली. अशातच ‘डान्स दिवाने’ हा कार्यक्रम संपला असून कलाकारांनी त्यांच्या नव्या कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान, या सेटवरुन ऐश्वर्या बेशुद्ध झाल्याची बातमी समोर आली. तेव्हापासून अभिनेत्रींच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळालं.

आणखी वाचा – ‘तू माझी पुरणपोळी रे’ गाण्यासाठी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार सौरभ चौघुले व योगिता चव्हाण, पोस्टर प्रदर्शित

अखेर आता अभिनेत्रीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ३१ वर्षीय ऐश्वर्याने इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. “मी तिसऱ्यांदा ओरडून सांगत आहे कारण मी सततच्या मॅसेजला कंटाळले आहे. कोणतेही निष्कर्ष काढणे थांबवा, मी एक माणूस आहे आणि कधीकधी माझाही रक्तदाब कमी होतो आणि तुमच्या माहितीसाठी माझा बीपी ६०-८० होता. त्यामुळे मी सेटवर बेशुद्ध पडले. मी गरोदर नाही. आता ही अफवा थांबवा”, असं म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – शेवटच्या क्षणीही आदेश बांदेकरांचंच नाव घेते होते त्यांचे सासरे, सुचित्रा यांनी सांगितलं काय घडलं होतं?, म्हणाल्या, “बाबा शेवटपर्यंत…”

ऐश्वर्या आणि निलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, नील आणि ऐश्वर्या डान्स शो ‘डान्स दीवाने ४’ मध्ये दिसले होते. याशिवाय ही जोडी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. शिवाय ही जोडी अनेक रील व्हिडीओ बनवतानाही दिसते.

Tags: Aishwarya Sharmaaishwarya sharma and neil bhattAishwarya Sharma On Pregnancyentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Sameer Dharmadhikari On Laxmikant Berde

"तुला इथे काम मिळणार नाही…", समीर धर्माधिकारींना लक्ष्मीकांत बेर्डेंनी दिलेला सल्ला, आठवण शेअर करत म्हणाले, "तू मराठीत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.