सोमवार, ऑगस्ट 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शेवटच्या क्षणीही आदेश बांदेकरांचंच नाव घेते होते त्यांचे सासरे, सुचित्रा यांनी सांगितलं काय घडलं होतं?, म्हणाल्या, “बाबा शेवटपर्यंत…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 19, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suchitra Bandekar shared Incident

शेवटच्या क्षणीही आदेश बांदेकरांचंच नाव घेते होते त्यांचे सासरे, सुचित्रा यांनी सांगितलं काय घडलं होतं?, म्हणाल्या, "बाबा शेवटपर्यंत…"

गेली ३३ वर्ष कोणतीही तक्रार न करता एक मराठमोळी कलाकार जोडी सुखाचा संसार करत आहे. ही जोडी म्हणजे अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि अभिनेते आदेश बांदेकर. सुचित्रा व आदेश हे दोघेही लोकप्रिय जोडींपैकी एक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. दोघांनीही त्यांच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सुचित्रा व आदेश यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आदेश यांनी आजवर होम मिनिस्टर या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवली. तर सुचित्रा यांनी अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. (Suchitra Bandekar shared Incident)

सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांनी पळून लग्न केलं आहे. त्यांच्या प्रेमाचे अनेक किस्से आहेत. याबद्दल सुचित्रा बांदेकर यांनी बऱ्याच मुलाखतींमध्ये भाष्य केलं आहे.आदेश आणि सुचित्रा यांचं लग्न झालं तेव्हा आदेश जेमतेम ३६५ रुपये महिना कमवत होते. आदेश यांच्याकडे काम नसल्याने दोघांच्याही घरून त्यांच्या लनासाठी प्रचंड विरोध होता. घरचे जबरदस्ती करुन लग्न करुन देतील या भीतीने आदेश यांच्याकडे सुचित्रा यांनी लग्न करण्याचा हट्ट धरला. काहीच काम नसल्याने आदेश लग्नाला तयार नव्हते पण त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा पळून जाऊन लग्न केलं, ही कथा अनेकदा सुचित्रा यांनी मुलाखतींद्वारे सांगितली आहे.

आणखी वाचा – “नोकरी करणाऱ्या महिला मुर्ख का?”, ‘घरोघरी मातीच्या चुली’चा प्रोमो पाहून भडकले प्रेक्षक, ‘तो’ सीन पाहून मुर्खही म्हटलं कारण…

View this post on Instagram

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

घरच्यांचा विरोध ते घरच्यांच्या मनात जागा मिळवण्यापर्यंतचा दोघांचा हा प्रवास खूप उत्तम आहे. अगदी सहजतेने व दोघांच्या स्वभावांनी त्यांनी त्यांच्या घरच्यांची मनं जिंकली. नुकतीच सुचित्रा यांनी सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी सुचित्रा यांनी आदेश यांच्याबाबत बरंच भाष्य केलं. यावेळी सुचित्रा यांनी बोलताना त्यांच्या घरच्यांबाबतही भाष्य केलं.

आणखी वाचा – असाही लग्नसोहळा! नंदेश उमप यांनी पत्नीसह पुन्हा केलं लग्न, शाही थाट, डिझाइनर कपड्यांनी वेधलं लक्ष, पाहुणे मंडळींची गर्दी अन्…

यावेळी बोलताना सुचित्रा यांनी त्यांच्या वडिलांची आठवण शेअर केली. त्या म्हणाल्या, “आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. पुढचा-मागचा कसलाही विचार न करता लग्न केलं. त्याच्यामुळे सर्व जबाबदारी अंगावर आली आणि गरजेपोटी मी काम करायला सुरुवात केली. आदेशच्या घरुनही मला पाठिंबा होता. माझे बाबा आता या जगात नाहीत. त्यांना अल्झायमर हा आजार झाला होता. पण कोणाला खरं वाटणार नाही तर शेवट्पर्यंत त्यांना फक्त आदेशचं नाव लक्षात होतं”.

Tags: adesh bandekarsuchitra bandekarsuchitra bandekar familySuchitra Bandekar shared Incident
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

New Marathi Movie Dashami
Entertainment

अन्यायावर विजयाची गर्जना, ‘दशमी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याची ही एंट्री

ऑगस्ट 10, 2026 | 3:14 pm
Amruta Khanvilkar Legal Action on Divorce Rumours
Entertainment

“खोटी माहिती प्रसारित केल्यास…”, अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अभिनेत्री संतापली; पोस्ट शेअर करत कडक कारवाईचा इशारा

ऑगस्ट 10, 2026 | 12:54 pm
Actress Talk about Past Relationship
Entertainment

एक्स बॉयफ्रेंडने दिले होते सिगारेटचे चटके; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “आजही खुणा…”

ऑगस्ट 10, 2026 | 10:46 am
Jayanti 2 Teaser
Entertainment

सशक्त महिला पात्र असलेला ‘जयंती २’ येतोय, चित्रपटाच्या टिझरने वेधलं लक्ष, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 8, 2026 | 9:28 am
Next Post
actress dipti naval life

नवऱ्यापासून लग्नाच्या दोन वर्षांमध्येच घटस्फोट, बॉयफ्रेंडचाही गंभीर आजाराने मृत्यू, सुप्रसिद्ध अभिनेत्रीची होती विचित्र अवस्था, आता करते 'हे' काम

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.