मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तू माझी पुरणपोळी रे’ गाण्यासाठी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार सौरभ चौघुले व योगिता चव्हाण, पोस्टर प्रदर्शित

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 19, 2024 | 7:10 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
new hoili song 2024

new hoili song 2024

होळी सण म्हटलं की, मजा-मस्ती, धमाल, रंगांची उधळण असं संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. त्याचबरोबरीने होळीच्या रंगात न्हाऊन निघालेली गाणीही आपसुकच कानी पडतात. देशभरात तर होळी पूर्वीची तयारी सुरु झाली आहे. तर सेलिब्रिटी मंडळीही होळीसाठी सज्ज होत आहेत. अशातच आता होळीच्या ऐन मुहूर्तावर मराठीमध्ये एक धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तू माझी पुरणपोळी रे’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यामध्ये नक्की कोणते कलाकार दिसणार? याबाबत सोशल मीडियावरही बरीच चर्चा रंगली. आता अखेरीस गाण्यामधील कलाकारांचे चेहरे समोर आले आहेत.

नुकतंच ‘तू माझी पुरणपोळी रे’ गाण्याचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरद्वारे गाण्यातील कलाकारांचे चेहरे समोर आले आहेत. मराठीतील नवविवाहित जोडपं सौरभ चौघुले व योगिता चव्हाण गाण्यात धमाल करताना दिसतील. पोस्टरद्वारे त्यांचा भन्नाट लूक समोर आला आहे. योगिताचा लूक अगदी खुलून दिसत आहे. तर सौरभही डान्स करण्यात मग्न आहे. लग्नानंतर त्यांचा हा पहिलाच एकत्रित प्रोजेक्ट असणार आहे. शिवाय या दोघांची जोडीही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे.

आणखी वाचा – नवरा-बायकोची जबरदस्त जुगलबंदी रंगणार, रोहित-जुईलीच्या आवाजातील ‘तू माझी पुरणपोळी रे’ गाणं लवकरच येणार

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

विशेष म्हणजे रोहित राऊत व जुईली जोगळेकरने या गाण्याला आवाज दिला आहे. म्हणजेच गाण्यासाठी आवाज दिलेले गायकही खऱ्या आयुष्यातील एकमेकांचे साथी आहेत. रोहित व जुईलीने अगदी उत्साहाने हे नवं कोरं होळीचं गाणं गायलं आहे. काही दिवसांपूर्वीच रोहित-जुईलीने त्यांच्या सोशल मीडियाद्वारे एक खास पोस्ट शेअर करत त्यांच्या आगामी नवीन गाण्याबद्दल सांगितलं होतं. दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांच्या आगामी गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यानचे खास फोटो पोस्ट केले होते. तेव्हापासून त्यांच्या अनेक चाहत्यांना या नवीन गाण्याविषयी उत्सुकता होती.

आणखी वाचा – रोहित राऊत पत्नीसह एकाच गाण्यासाठी करणार एकत्र काम?, नक्की कोणतं गाणं असणार?, दोघांनीही शेअर केलेल्या पोस्टमुळे उत्सुकता

मीडिया वन सोल्यूशन्स प्रस्तुत व इट्स मज्जा ओरिजिनल हे होळीनिमित्त प्रेक्षकांसाठी खास गाणं घेऊन येणार आहेत. २१ मार्चला हे गाणं रसिक श्रोत्यांच्या भेटीला येणार असून या गाण्याविषयी चाहत्यांमध्येही चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. आता सौरभ व योगिताच्या होळी गाण्याचा धमाल प्रतिसाद मिळणार एवढं नक्की.

Tags: entertainment newsmarathi actorMarathi news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Suchitra Bandekar shared Incident

शेवटच्या क्षणीही आदेश बांदेकरांचंच नाव घेते होते त्यांचे सासरे, सुचित्रा यांनी सांगितलं काय घडलं होतं?, म्हणाल्या, "बाबा शेवटपर्यंत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.