शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : फ्रान्समध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची बातमी कळली अन्…; ‘त्या’ व्यक्तीने अंकिता लोखंडेला सांगितली सत्य परिस्थिती, लोक रडू लागले आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 24, 2024 | 11:49 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 contestants list and more in marathi

बिग बॉस १७ लेटेस्ट अपडेट

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’च्या घरात अंकिता लोखंडे सुशांत सिंग राजपूतचा अनेकदा उल्लेख करताना दिसली. या प्रकरणावरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलेलंही पाहायला मिळालं आणि यावर प्रश्नही उपस्थित करण्यात आले. अंकिताने सांगितले की, ती फुटेजसाठी त्याचा उल्लेख करत नाही पण तिला सुशांतबद्दल बोलण्याचा अभिमान वाटतो. २१ जानेवारीला सुशांतचा वाढदिवस होता. यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात अंकिताने पुन्हा एकदा त्याची आठवण काढली. यादरम्यान अरुण माशेट्टी याने पहिल्यांदाच सुशांतशी संबंधित एक मजेशीर गोष्ट सांगितली.

‘बिग बॉस’च्या शेवटच्या भागात अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैन, अरुण व अभिषेकसह बसून गप्पा मार्ट होती. यादरम्यान अरुण तिला म्हणाला, “मी सुशांत भाईबद्दल कधीच बोललो नाही कारण तुझा त्याच्याबरोबर भूतकाळ आहे आणि मला वाटतं त्याच्या आठवणींनी तुला दुःख होईल. पण मी तुला एवढेच सांगू इच्छितो की, माझ्या पत्नीच्या देशात (फ्रान्स) मध्ये सुशांत भाईच्या निधनाच्या बातम्या फ्रेंच वा अरबी भाषेत सर्वत्र अनुवादित झाल्या. ही बातमी कळताच तेथील देशवासीयही रडले आणि दु:खी झाले. तिकडे सुद्धा नेमकं काय झालं हा प्रश्न साऱ्या चाहत्यांना पडला होता”.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेला ज्याची भीती होती तेच घडलं, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर येताच अभिनेत्रीच्या नवऱ्याने काय केलं पाहा

यावर अंकिता असं म्हणताना दिसत आहे की, “आज सुशांतचा वाढदिवस आहे”. सुशांत हा ग्लोबल स्टार असल्याचेही विकी जैन या संवादादरम्यान म्हणाला. अंकिताचा पती विकी जैनचा ‘बिग बॉस’मधील प्रवास संपला आहे. या शोमध्ये अरुण माशेट्टी, अंकिता लोखंडे, मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार हे पाच स्पर्धक फिनालेमध्ये पोहोचले आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “तुला असं पाहण्याचे दु:ख…”, अंकिता लोखंडेला ढसाढसा रडताना पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भावुक, म्हणाली, “मला विश्वास आहे की… “

‘बिग बॉस’मधील स्पर्धकांनी पत्रकार परिषदेत अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’ मध्ये इतर स्पर्धकांशी दिवंगत सुशांत सिंह राजपूतबद्दल का बोलते, हा तिच्या गेम शोचा भाग आहे का, असं विचारण्यात आलं. यावेळी उत्तर देत अंकिता म्हणाली, “मी नेहमी सुशांतबद्दल फक्त चांगल्याच गोष्टी बोलले, कारण मला वाटतं की या प्लॅटफॉर्मवरून मी त्याच्याबद्दल काही चांगल्या गोष्टी सांगू शकते तर मी ते का सांगू नये? त्याने चांगली कामं केली आहेत. आणि मी याबद्दल बोलू शकते कारण मला त्याच्याबद्दल माहित आहे आणि मी त्याचा प्रवास जवळून पाहिला आहे. त्यामुळे त्याच गोष्टी मी त्याच्याबद्दल बोलत असते”.

Tags: ankita lokhande and vicky jainbigg bossbigg boss 17entertainmentsushant singh rajput
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : "तू खूप…", 'बिग बॉस मराठी' विजेता सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची अंकिता लोखंडेच्या नवऱ्यासाठी पोस्ट, म्हणाला, "माझा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.