Bigg Boss 17 Latest News : अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’ मुळे चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर अंकिताने अलीकडेच तिचा बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंग राजपूतबद्दल खुलासा केला आहे. अंकिताने सांगितले की, सुशांतने त्याच्या ‘पीके’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर बुक केले होते. अंकिताला पडद्यावर इंटिमेट सीन करताना बघणे आवडणार नाही हे त्याला चांगलेच माहीत होते.
‘बिग बॉस १७’ या रिऍलिटी शोमध्ये अंकिता अभिषेकसह सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलताना दिसत आहे. रिलेशनशिपमध्ये पझेसिव्ह असणं किती महत्त्वाचं आहे यावर दोघं चर्चा करताना दिसत आहेत. अंकिताने ती सुशांतला डेट करतानाचा काळ आठवला. सुशांतचा ‘शुद्ध देसी रोमान्स’ रिलीज झाला तेव्हा अंकिताने चित्रपटात दाखवलेले इंटिमेट सीन्स एकट्याने पाहावेत अशी त्याची इच्छा होती.
याबाबत अंकिता म्हणाली, “सुशांतने माझ्यासाठी संपूर्ण हॉल बुक केला होता. त्या हॉलमध्ये फक्त मी व सुशांत होतो. अशी दृश्ये पाहून मला राग येईल हे त्याला माहीत होते. मी ती दृश्ये पाहिली. संपूर्ण चित्रपट संपल्यावर आम्ही घरी गेलो आणि खूप रडलो. घरी आल्यावर त्याने माझी माफी मागितली असली तरी ते दृश्य माझ्या मनातून हटत नव्हते”.यापुढे अंकिता म्हणाली, “चित्रपट पाहिल्यानंतर जेव्हाही मी व सुशांत एकमेकांशी जवळीक साधायचो, तेव्हा मला सारखेच फ्लॅशबॅक आठवायचे. ती दृश्ये सारखी माझ्या मनात यायची आणि मी त्याकडे दुर्लक्ष करायची. तुमचा प्रियकर दुसर्याशी जवळीक साधताना पाहून कोणालाच आनंद वाटत नसेल”.
आणखी वाचा – मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचा असा पार पडला साखरपुडा सोहळा, फोटो आले समोर
त्यावेळी अंकिताला असं विचारण्यात आलं की, सुशांतने चित्रपटातील कोणत्याही सहकलाकाराला किस करण्याची परवानगी घेतली होती का? यावर उत्तर देत अंकिताने होकार दिला. अंकिता म्हणाली, “मी कोणाच्याही करिअरच्या आड येऊ शकत नाही. पण हो, अशी दृश्ये पाहणे ही वेगळी गोष्ट आहे”. सुशांतचा ‘पीके’ चित्रपटाची आठवण काढत म्हणाली, “या चित्रपटातील अनुष्का शर्माबरोबरच्या इंटीमेट सीनमुळे मला त्रास झाला. ‘पीके’ बघताना मला चक्कर आली होती” असंही अभिनेत्री म्हणाली.