सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : होणाऱ्या नवऱ्याला सतत किस करत होती आमिर खानची लेक, व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी, म्हणाले, “थोडी तरी लाज ठेव”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 26, 2023 | 1:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aamir Khan Daughter Ira Khan Troll

Video : सतत होणाऱ्या नवऱ्याला किस करत होती आमिर खानची लेक, व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी, म्हणाले, "थोडी तरी लाज ठेव"

बॉलिवूड कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अशातच आता अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान चर्चेत आली आहे. आयरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच तिचा नुपूर शिखरेसह साखरपुडा झाला. आयरा व नुपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी एकमेकांबरोबर बराच काळ एकत्र घालवल्यानंतर आयरा व नुपूर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही पोस्ट शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. (Aamir Khan Daughter Ira Khan Troll)

अशातच अलीकडे आयरा खानने एक पोस्ट केली. तिच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये आयराने तिच्या भूतकाळातील काही खास क्षणांचे व्हिडिओ शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आठवणींच्या रस्त्यावरून प्रवास.’ यातील पहिल्या व्हिडिओमध्ये आयरा तिच्या होणारा नवरा नुपूर शिखरेबरोबर व्यायाम करताना दिसत आहे. व्यायामादरम्यान आयरा नुपूरसह वारंवार लिप-लॉक करताना दिसली, या व्हिडीओमुळे ती ट्रोल झाली आहे.

आणखी वाचा – नियॉन रंगाचा ड्रेस, हातात बांगड्या अन्…; थाटात सासरी पोहोचली परिणीती चोप्रा, गळ्यातील हटके मंगळसूत्राने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आयरा खानला तिच्या होणाऱ्या पतीबरोबर वारंवार किस करताना पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले आहे की, “दोघांचे लग्न झालेले नाही, त्यांची फक्त एंगेजमेंट झाली आहे. दोघेही वेडे दिसत आहेत. पती-पत्नी असल्यासारखे ते जगत आहेत. तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “थोडी लाज बाळगा मॅडम”.

आणखी वाचा – वाट चुकलेल्या श्रेयस तळपदेला देवानेच दाखवला रस्ता, पोस्ट शेअर करत म्हणाला, “कोणत्या रुपामध्ये देव…”

आयरा व नुपूर यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा सोहळा उरकला. त्यांच्या साखरपुड्याला बॉलिवूड जगतातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. लवकरच आता आयरा नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आयरा खान व नुपूर शिखरे ३ जानेवारीला कोर्ट मॅरेज करणार असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर ते राजस्थानच्या उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न करणार आहेत. हे लग्न जवळच्या मित्र परिवाराबरोबर व कुटुंबियांच्या उपस्थित करणार असल्याचं समोर आलं आहे.

Tags: aamir khanAamir Khan Daughter Ira Khan Trollentertainmentira khanira khan troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
ashvini mahangade troll

“पाठीवर, पदरावर गणपती नसावा आणि...”, ब्लाऊजवर बाप्पाची डिझाइन पाहून अश्विनी महांगडेला चाहतीने सुनावलं, अभिनेत्री म्हणाली, “यापुढे...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.