कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो दिवसेंदिवस अधिकच रंजक होत चालला आहे. या शोमध्ये येणारे नवनवीन ट्विस्टस या शोची चाहत्यांमधील उत्कंठा शिगेला नेत आहेत. आता या शोमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. मुन्नवरची एक्स-गर्लफ्रेंड आयेशा खानने या शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एण्ट्री केली आहे. आशातच या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये मुन्नवर रडताना दिसत आहे. (Bigg Boss 17 : New Promo)
आयेशाने घरी येताच मुन्नवरवर आरोपांच्या अनेक फैरी झाडल्या आहेत. मुन्नवर फारुकीबरोबर तिचा जुना इतिहास आहे. “मुन्नवर या घरात जसा वागतो तसा तो अजिबात नाही. मला तो माझ्यावर प्रेम करतो आणि माझ्यासारख्या मुलीबरोबर लग्न केलं पाहिजे असं तो म्हणाला होता. चुकांना माफी असते. पण गुन्ह्याला माफी नसते. त्याने जे काही केलं आहे तो एक गुन्हा आहे. मी जेव्हा या शोमध्ये जाईन तेव्हा त्याने माझी माफी मागावी अशी माझी इच्छा आहे.”असं म्हणत त्याच्यावर आरोपांच्या अनेक फैरी झाडल्या. तिच्या या आरोपांनी मुन्नवर रडकुंडीला आला असल्याचे या प्रोमोमध्ये दिसत आहे.
आणखी वाचा – ‘या’ आठवड्यात प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार या नव्या वेबसीरिज व चित्रपट, पाहा संपूर्ण यादी
या नवीन प्रोमोमध्ये, ” मी खोटा नाही आहे. पण मी लोकांची मनं तोडली आहेत तर काय करु?. मला आता या घरातून बाहेर जायचे आहे असं म्हणत आहे. त्याला रडताना पाहून घरातील सदस्य त्याचे सांत्वन करताना दिसत आहेत. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. मुन्नवरने आयशाला पाहताच नाझिला सिताशीबरोबर ब्रेकअपची घोषणा केली. तसेच आयेशाने केलेल्या अनेक आरोपांवरही त्याने सध्या मौन पाळले आहे.
आणखी वाचा – काजोलची आई व ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार अन्…
आता आयेशाच्या घरी येण्याने त्यांच्यात काही संघर्ष निर्माण होणार का? यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तसेच मुन्नवर घरातील त्याचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी काय करणार हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे आगामी भागात मुन्नवरचे घरातील दिवस कसे जातात|? हे पाहणे प्रेक्षकांसाठी व चाहत्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.