७०-८० च्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्री तसेच बॉलिवूड अभिनेत्री काजोल यांच्या आई तनुजा यांच्या तब्येतीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. तनुजा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या तब्येतीबाबत अचानक आलेल्या या वृत्ताने चाहते काळजीत पडले आहेत. (Actress Tanuja hospitalised)
अभिनेत्री तनुजा यांचे वय ८० वर्षे असून वाढत्या वयातील काही शारीरिक आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. त्यांना सध्या ‘आयसीयू’मध्ये ठेवण्यात आलं आहे. तनुजा यांच्यावर डॉक्टर उपचार करत असून काळजी करण्याचे काहीही कारण नाही. आणखी काही वेळ त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. असं ‘पीटीआय’च्या अहवालात म्हटले आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’ मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर झाली आई, कुटुंबात चिमुकलीचं आगमन
चित्रपट निर्माते कुमारसेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांची मुलगी, तनुजा यांनी हिंदी व बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी मोठी बहीण नूतन यांच्याबरोबर बालकलाकार म्हणून ‘हमारी बेटी’ या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट ‘हमारी याद आएगी’ हा होता. ‘बहारें फिर भी आएंगी’, ‘पैसा या प्यार’, ‘हाथी मेरे साथी’ व ‘मेरे जीवन साथी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
आणखी वाचा – “मला कोणी…”, नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाची रोमँटीक पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, “तो संपूर्ण…”
दरम्यान, तनुजा यांची मुलगी अभिनेत्री काजोल व अभिनेता अजय देवगण यांनी अद्याप तनुजा यांच्या प्रकृतीबाबत मीडियाशी कुठलाही संवाद साधलेला नाही. तनुजा या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी त्यांचे चाहते व कुटुंबीय प्रार्थना करत आहेत.