करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा लोकप्रिय कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. अशातच या कार्यक्रमाचा आठवा सीजन सुरु झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांमुळे तसेच या कलाकारांच्या विविध वक्तव्यांमुळे हा कार्यक्रम नेहमीच खास ठरतो. अशातच या सीजनमध्ये बॉलिवूडमधील दोन बड्या चेहऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. (Koffee With Karan New Promo)
करण जोहरचा ‘कॉफी विथ करण ८’ हा शो खूप चर्चेत असताना या कार्यक्रमाला पाहुणे म्हणजे अभिनेता अजय देवगण व दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी हजेरी लावली असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोवरून समोर आलं आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये अजय देवगण व रोहित शेट्टी करण जोहरसह मज्जा-मस्ती करताना दिसत आहेत. करणने या दोन्ही पाहुण्यांचं जंगी स्वागत केलेलं पाहायला मिळत आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये, करण रोहितला विचारताना दिसतो की, अजय यशावर प्रतिक्रिया देताना दिसतो का? यावर रोहित उत्तर देत म्हणतो, “चित्रपट हिट असो वा फ्लॉप, अजय त्याच्या व्हॅनमध्ये मस्ती करत असतो”. यानंतर करण त्याच्या रॅपिड फायर राउंडमध्ये अजयला काही गमतीशीर प्रश्न विचारतो. करण अजयला विचारतो, ‘तू पार्टीला का जात नाहीस?’ यावर अजय उत्तर देत म्हणतो, ‘कारण मला कोणी फोन करत नाही’. यानंतर करण पुढचा प्रश्न विचारत म्हणतो, ‘पापाराझी तुमचे विमानतळावर फोटो का काढत नाहीत’. यावर उत्तर देताना अजय म्हणतो, ‘कारण मी त्यांना फोन करून बोलावत नाही’ असं म्हणतो.
आणखी वाचा – वयाच्या ७२व्या वर्षी ब्रिजेश त्रिपाठी यांचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यामुळे गमावला जीव
यांनतर करण अजयला प्रश्न विचारतो की, ‘काजोल तुझ्याशी बोलत नसेल तर त्याचे कारण काय असू शकतं? यावर हसत हसत अजय म्हणतो, ‘मी त्या दिवसाची वाट पाहतोय जेव्हा ती माझ्याशी बोलणार नाही’. यानंतर करण अजयला ‘इंडस्ट्रीत तुझा कोणी शत्रू आहे का?’ असा प्रश्न विचारतो, यावर उत्तर देत तो म्हणतो, ‘होय, एकेकाळी तू होतास’ असं म्हणत गमतीत उत्तर देतो.