शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अरमान मलिकच्या पत्नीचं मोठं विधान, घटस्फोट घेणार असल्याचंही आलं समोर, स्वतःच म्हणाली, “कृतिकाबरोबर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 20, 2024 | 9:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
payal malik on arman malik

अरमान मलिकच्या पत्नीचं मोठं विधान, घटस्फोट घेणार असल्याचंही आलं समोर, स्वतःच म्हणाली, "कृतिकाबरोबर..."

सध्या ‘बिग बॉस ओटीटी ३’ची जोरदार चर्चा आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळतात. युट्यूबर अरमान मलिक हा अधिक चर्चेत येऊ लागला आहे. यामध्ये अरमानच्या दोन बायका म्हणजे पायल मलिक व कृतिका मलिक यादेखील सहभागी झाल्या होत्या. मात्र काही कारणांमुळे पायल काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस…’मधून बाहेर पडली. मागील आठवड्यात अरमानने सदस्य विशाल पांडेला कानशीलात लगावल्याने अरमानला घराबाहेर काढण्याची विनंतीदेखील विशालच्या आईवडिलांनी केली होती. मात्र आता त्याची पहिली पत्नी पायलने अरमानबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. (payal malik on arman malik)

‘बिग बॉस…’च्या घरातून बाहेर आल्यानंतर पायल ही व्लॉगच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहू लागली. तिने आपल्या अनेक भावना सोशल मीडियातून व्यक्त केल्या आहेत. तिने व्लॉगमध्ये ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्याचेही अनेकदा सांगितले आहे. यामुळे तिला आता या सगळ्यांचा त्रास होत असल्याचेही सांगितले.

आणखी वाचा – ‘या’ कारणांमुळे करीनाला सैफ अली खानबरोबर राहणं झालं कठीण, अभिनेत्रीने स्वतः खुलासा करत सांगितलं कारण, म्हणाली, “आमच्या नात्यात…”

View this post on Instagram

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

पायलने नुकताच एक व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये तिला अरमानपासून वेगळे होणार असल्याचे सांगितले, ती म्हणाली की, “मी आता या सगळ्यामुळे खूप त्रस्त झाले आहे. जोपर्यंत हे सगळं माझ्याबाबतीत होतं तोपर्यंत ठीक होतं. पण आता याचा परिणाम माझ्या मुलांवरही होऊ लागला. हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे आता मी अरमानला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुलांचा सांभाळ करेन. अरमान कृतिकाबरोबर राहील”.

आणखी वाचा – बॉलिवूडमधील कास्टिंगबाबत ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्रीचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाली, “कलाकार म्हणून काम करण्यासाठी…”

पुढे ती म्हणाली की, “मला माहीत आहे की कृतिका जैदशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे ती त्याच्याबरोबर राहील. मी माझ्या तीन मुलांबरोबर वेगळं राहीन. आम्ही तिघं वेगळे राहू. हे आम्ही सगळं ऐकू शकतो पण मुलांसाठी हे तितकं सोपं नाही. आम्ही अशा ठिकाणी शिफ्ट होऊ जिथे आम्हाला कोणीही ओळखत नसेल. लोकं आमच्याबद्दल इतकं काही बोलत आहेत की मी ते तुम्हाला सांगू शकत नाही. जे आम्हाला चांगलं समजत होते तेदेखील आमच्याबद्दल खूप वाईट बोलत आहेत”.त्यामुळे आता ‘बिग बॉस…’ मधून बाहेर पडल्यानंतर खरच अरमान व पायलचा घटस्फोट होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: Armaan malikbig boss ott 3divorcepayal malik
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Dharmaveer 2 Trailer

“कुणाशी तरी आघाडी करुन विकलात की तुम्ही भगवा रंग”, अखेर ‘धर्मवीर २’चा ट्रेलर समोर, डायलॉग चर्चेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.