सध्या ‘बिग बॉस ओटीटी ३’ची चर्चा सुरु आहे. हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून चांगलीच चर्चेत आले आहेत. या कार्यक्रमामध्ये मनोरंजन, सोशल मीडिया स्टार, युट्यूब या क्षेत्रातील अनेक ओळखीचे चेहरे बघायला मिळत आहेत. या कार्यक्रमामध्ये युट्यूबर अरमान मलिक व त्याच्या दोन्ही पत्नींनी सहभाग घेतला आहे. तेव्हापासूनच तो अधिक चर्चेत आला. मागील आठवड्यात अरमानची पहिली पत्नी पायल घरातून नॉमीनेट झाली होती. घराबाहेर पडल्यानंतर पायल अधिक चर्चेत राहू लागली आहे. तिचे अनेक व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले. सध्या तिच्या एका व्हिडीओने सगळ्यांचेच चांगले लक्ष वेधले आहे. (payal malik viral video)
‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये सहभागी झालेल्या पायलने अधिक लोकप्रियता मिळवली आहे. मात्र बाहेर आल्यानंतर तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पुन्हा एकदा तिचा व्हिडीओ समोर आला असून तिने तिच्या कुटुंबियांबद्दल भाष्य केले आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली आहे की, “मी फोन बघणं बंद केले आहे. कारण मी खूप चुकीचं केलं आहे असे सगळे जण म्हणत आहेत. हे केलं, ते केलं, अरमानला घराबाहेर काढा. मग काढा ना बाहेर! नका काढू असं कुठे मी म्हंटलं कधी. तिथून बाहेर काढा घरी पाठवा. त्याचं तो घर सांभाळेल, मुलं सांभाळेल मी एकटी खूप कंटाळले आहे”.
BiggBossOTT3 | #PayalMalik Says, Nikal Do Golu Ko Aur Armaan Ko, Aakar Hume Zeher De Do, Sara Kalesh Khatam… Payal On Receiving Hate Comments#ArmaanMalik #KritikaMalik #VishalPandey pic.twitter.com/EtPznOLrL5
— Mohd Uvaish (@MohdUvaish1279) July 11, 2024
पायल पुढे म्हणाली की, “अरमानलाच का? गोलूला (कृतिका) पण घराबाहेर काढा. कारण आमच्या कुटुंबाला सगळ्यांचा तिरस्कार सहन करावा लागत आहे. असं वाटत आहे की जगात आमचेच कुटुंब आहे जे खूप चुकीचे काम करत आहे. नाहीतर असं करा की आमचे सात लोकांचं कुटुंबं आहे या आम्हाला विष द्या. सगळे विषयच संपतील”.
‘बिग बॉस ओटीटी ३’ मधून बाहेर पडल्यानंतर पायलने ‘विकेंड का वॉर’साठी स्टेजवर होती. त्यावेळी तिने विशाल पांडेने कृतिकाबद्दल जे बोलला ते तिने सांगितले. त्यानंतर अरमानने विशालच्या कानशिलात लगावले. या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झाली होती.