रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : हिना खानने गुपचूप उरकलं लग्न?, भांगेत कुंकू भरलेला व्हिडीओ व्हायरल, म्हणाली, “माझं लग्न…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 11, 2024 | 6:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
hina khan new look

Video : हिना खानने गुपचूप उरकलं लग्न?, भांगेत कुंकू भरलेला व्हिडीओ व्हायरल, म्हणाली, "माझं लग्न..."

 ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून अभिनेत्री हिना खान घराघरात पोहोचली. ‘अक्षरा’ ही भूमिका तिने साकारली होती. ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर तिने अनेक मालिका व अनेक शोमधून ती प्रेक्षकांच्या समोर आली होती. विशेषतः ‘बिग बॉस’ व ‘खतरो के खिलाडी’ या शोमधून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेमध्ये तिने साकारलेल्या ‘कोमोलिका’ या खलनायिकेच्या भूमिका खूप पसंत केली गेली. ती आपल्या सोशल मीडियावर देखील अधिक सक्रिय असते आणि चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असते. पण आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (hina khan new look)

रमजान ईदच्या दरम्यान तिने आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पण यावेळी तिच्या व्हिडीओमधील एका गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. जेव्हा हिना प्रेक्षकांच्या समोर आली तेव्हा तिच्या भांगेत कुंकू असलेले दिसून आले. त्यामुळे तिचा एक वेगळा अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला. यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली. तसेच नेटकाऱ्यांनी “लग्न झाले का?”, असे विचारण्यास सुरवात केली.  

आणखी वाचा – “१२ तासांचं काम अर्ध्या तासात करायचं अन्…”, हिंदी चित्रपटाच्या सेटवर मिळत असलेल्या वागणूकीवर मराठी अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली, “त्यांच्यावरच सगळे कॅमेरा…”

View this post on Instagram

A post shared by ???????????????? ???????????????? (@realhinakhan)

तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हंटले आहे की, “तुम्हा सर्वांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या आवाजासाठी मी माफी मागते. माझी तब्येत खराब आहे. पण मी सर्वांनाच शुभेच्छा देऊ इच्छिते. तसेच माझे लग्न झाले नाही. हा माझ्या चित्रीकरणाचा एक भाग आहे. त्यामुळे मी स्वतःला असे झाकून घेतले आहे”.

आणखी वाचा – …अन् दीपिका कक्करने नवऱ्याला रात्रभर ठेवलं घराबाहेर, २० कॉल करुनही दरवाजा उघडलाच नाही, म्हणाला, “बाहेर पायऱ्यांवरच बसून राहिलो आणि…”

तसेच पुढे ती म्हणाली की, “तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर ईद साजरी करत असालच तसेच तुमचे रोजे देखील चांगले झाले असतील. माहीत नाही माझ्या आवाजाला नक्की काय झाले आहे ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा”.

हिनाच्या या व्हिडीओला प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शवली असून तिला देखील ईदच्या  शुभेच्छा देण्यात आहेत.

Tags: hina khannew looksindoorvideo
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Shubhankar Ekbote and Amruta Bane's Vyahi Bhojan celebrated photos viral on social media

दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंच्या लेकाचं शाही विवाहभोजन थाटामाटात पार, पारंपरिक परंपरा जपल्यामुळे चाहत्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.