अभिनेता शुभंकर एकबोटे व अभिनेत्री अमृता बने टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय जोडी आहे. ‘कन्यादान’ मालिकेतून दोघे घराघरांत पोहचले. आता ही रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्येही एकत्र आले आहेत. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी साखरपुडा करत त्यांच्या नात्याविषयी सांगितले. त्यांच्या या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अशातच हे दोघे आता लवकरच लग्न करणार आहेत. शुभंकर-अमृता यांचा नोव्हेंबर महिन्यात मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला होता. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे.
हिंदू विवाह पद्धतीत केळवणानंतर व्याही भोजनाची पद्धत असते. यात वराच्या आई-वडिलांनी वधूच्या आईवडिलांना जेवायला बोलवायचे असते. असाच अमृता-शुभंकर यांचा व्याही भोजनाचा खास कार्यक्रम पार पडला. काही दिवसांपूर्वी त्यांच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला. अमृताच्या कुटुंबियांनी अमृता व शुभंकरच्या केळवणाचा खास कार्यक्रम आयोजित केला होता. अशातच आता त्यांचा शाही व्याही भोजन सोहळादेखील पार पडला आहे आणि याचे काही खास फोटो अमृताने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
‘अशी हि व्याहीशाही’ असं कॅप्शन देत त्यांनी हे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अमृताने अमृताने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे व त्यावर लाल रंगाचा ब्लाऊजही परिधान केला आहे. तर शुभंकरने फिकट नारंगी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. शुभंकर व अमृता यांनी त्यांच्या नावावरून अशू नावाचा एक हॅशटॅगदेखील तयार केला आहे. अमृताने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा –
दरम्यान, ‘कन्यादान’ मालिकेत अमृता बनेने वृंदा आणि शुभंकर एकबोटेने राणा हे पात्र साकारले आहे. या मालिकेच्या सेटवरच अमृता-शुभंकर यांची पहिल्यांदा भेट झाली. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आता त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी त्यांचे अनेक चाहतेही चांगलेच उत्सुक आहेत.