रिॲलिटी शो ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वामधून मुनव्वर फारुकी अधिक चर्चेत आला. ‘बिग बॉस’ येण्याआधी तो स्टँडअप कॉमेडियन म्हणून अधिक प्रसिद्ध होता. गेल्या दिवसांपासून तो खूप चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी तो रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त हाती आले होते. पण तो ठीक होऊन घरी परतला. अशातच आता त्याच्या लग्नाबाबतच्या चर्चामुळे तो अधिक प्रकाशझोतात आला आहे. मुनव्वर मेकअप आर्टिस्ट महजबिन कोटवालाबरोबर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकल्याची चर्चा सुरु झाली होती. पण यामध्ये किती तथ्य आहे याबद्दल मात्र सगळ्यांनाच शंका होती. आता याबद्दल एक अपडेट समोर आली आहे. (munawar faruqui wedding )
मुनव्वर व महजबीन यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच आता मुनव्वरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘मैनू विदा करो’ हे गाणं देखील ऐकायला मिळत आहे. तसेच या व्हिडओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “दुबईमध्ये भेटूया”. दुसऱ्या लग्नाच्या अफवा सुरु असतानाच मुनव्वरने दुबईतील व्हिडीओ पोस्ट केल्याने नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच त्याच्या लग्नाबद्दलदेखील अनेक प्रश्न विचारण्यात आले.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत नवीन आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काही नेटकरी मुनव्वरला ट्रोलदेखील करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “दुबईमध्ये शोसाठी नाही तर हनिमूनसाठी जात आहे”, तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, “भावाला आता पासपोर्ट मिळाला आहे”. २६ मे रोजी महजबीनबरोबर मुनव्वरने लग्न केले. या लग्नासाठी त्याच्या कुटुंबातील व्यक्ती व जवळची मित्रमंडळी उपस्थित होते. परंतु मुनव्वरने आजपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
मुनव्वर व महजबीन यांची ओळख एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, महजबीन घटस्फोटीत असून तिला १० वर्षाची मुलगीदेखील आहे. तसेच मुनव्वरचेदेखील जॅस्मिन नावाच्या मुलीबरोबर लग्न झाले होते. त्याला एक मुलगा आहे त्याच नाव मिकाइल आहे. तसेच मुनव्वरचे मेहजबीनबरोबरचे लग्नानंतरचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण स्वतः मुनव्वरने अद्याप कोणतेही भाष्य केले नाही.