भोजपुरी अभिनेत्री व डान्सर संभावना सेठ नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. आजवर ती अनेक चित्रपट तसेच कार्यक्रमांमध्ये दिसून आली आहे. सध्या ती सोशल मीडियावर अधिक सक्रिय असलेली पाहायला मिळते. व्हिडीओच्या माध्यमातूनदेखील ती चाहत्यांच्या संपर्कात असलेली पाहायला मिळते. मात्र सध्या एका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्री २०१६ साली अभिनेता अविनाश द्विवेदीबरोबर लग्नबंधनात अडकली. लग्नाला आता आठ वर्ष झाली मात्र ती अद्याप आई बनू शकली नाही. संभावनाने नुकताच आई होण्याबद्दल भाष्य केले आहे. तिने आपले अनुभव सांगितले आहे. (sambhavna seth on ivf treatment)
अभिनेत्री देबिना बॅनर्जीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने सांगितले की, “जेव्हा माझी आयव्हीफ सुरु झाली तेव्हा मी व्हीडीओ नाही बनवायचे. पण एके दिवशी मी याबद्दलचा व्हिडीओ बनवण्याचा निर्णय घेतला. लोक मला बघत होते. त्यामुळे मला त्यांना हे सगळं दाखवायचं होतं. लोक माझ्या शरीरावर प्रतिक्रिया द्यायचे, माझं वजन कमी झालं आहे असंही ते म्हणायचे. त्यामुळे मी नक्की कोणत्या परिस्थितिमधून जात आहे हे त्यांना दाखवायचे होते.
पुढे ती म्हणाली की, “काही लोक म्हणाले की मूल होत नाही. पण असं का आहे? याचं कारण तर समजून घ्या. आम्ही कोणत्या गावात रहात नाही. माझ्या तब्येतीबद्दल खूप साऱ्या समस्या आहेत. त्यामुळे मी योग्य वेळी लग्न करु शकले नाही. माझ्या आयुष्यात खूप संघर्ष होता. जेव्हा मी भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये काम करत होते तेव्हा मला खूप संघर्ष करावा लागला होता. कारण तिथे पैसे खूप कमी मिळायचे. इतकं सगळं झाल्यावर लोकांना वाटलं की मी लग्न करणार नाही पण मी लग्न केलं”.
पुढे तिने सांगितले की, “मी मूल होण्यासाठी खूप प्रयत्न केले. अनेकदा आयव्हीएफ सुद्धा असफल ठरल्या. मुल होत नाही, माझ्यातच काहीतरी कमी आहे असं मला अनेक बायका बोलल्या. त्यामुळे मी अनेकदा घरातील कार्यक्रमांना जाणंच बंद केलं. पण माझ्या पतीने मला खूप साथ दिली”. दरम्यान सध्या संभावना अभिनयापासून दूर गेलेलीदेखील दिसून येत आहे.