बुधवार, ऑगस्ट 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अन्यायावर विजयाची गर्जना, ‘दशमी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याची ही एंट्री

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 10, 2026 | 3:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
New Marathi Movie Dashami

अन्यायावर विजयाची गर्जना, 'दशमी' चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

New Marathi Movie Dashami : भारतीय संस्कृतीत विजयादशमी हा केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट शक्तींवर स्त्रीशक्तीच्या विजयाचा शाश्वत संदेश देणारा दिवस आहे. भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून धर्माची स्थापना केली, तर आदिशक्ती देवी दुर्गेने महिषासुराचा संहार करून संपूर्ण सृष्टीला शक्ती, धैर्य आणि विजयाचा नवा अर्थ दिला. याच विजयाच्या, शक्तीच्या आणि परिवर्तनाच्या विचारांना समर्पित केएनके बॉक्स प्रस्तुत ‘दशमी’ हा मराठी चित्रपट ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे.

आणखी वाचा : “खोटी माहिती प्रसारित केल्यास…”, अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अभिनेत्री संतापली; पोस्ट शेअर करत कडक कारवाईचा इशारा

विजय, शक्ती आणि संघर्षाची झलक दाखवणाऱ्या ‘दशमी’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण नुकतेच करण्यात आले. प्रत्येक संघर्षातून उभा राहणारा विजय म्हणजेच खरी ‘दशमी’ हा विचार प्रभावीपणे मांडणाऱ्या या चित्रपटात अभिनेता महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम,अभिनेत्री गौरी इंगवले, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन आणि ‘दाक्षिणात्य स्टार’ रवि प्रकाश असे नामवंत कलाकार दिसणार आहेत. New Marathi Movie Dashami

View this post on Instagram

A post shared by Ravi Prakash (@raviprakash.actor)

यावेळी बोलताना दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, ‘दशमी’ हा विचार आहे, जो प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक कुटुंबाला आत्मविश्वास आणि बळ देतो. ‘दशमी’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या धैर्याचा आणि सत्याच्या विजयाचा प्रवास आहे. भारतीय संस्कृतीत विजयादशमी हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. त्याच विचाराला आजच्या काळातील सामाजिक वास्तवाशी जोडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नव्हे, तर विचार करायला लावणारा आणि मनात दीर्घकाळ घर करणारा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ऑक्टोबरला ‘दशमी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, याचा आम्हा संपूर्ण टीमला विशेष आनंद आहे. New Marathi Movie Dashami

आणखी वाचा : सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे ७४व्या वर्षी निधन, सलमान खानही भावुक, म्हणाला, “अनेक चांगले…”

बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे भव्य दृश्यरचना आणि उच्च दर्जाचे तांत्रिक सादरीकरण हे ‘दशमी’चे खास वैशिष्ट्य आहे. प्रत्येक फ्रेम बारकाईने साकारण्यात आली असून ‘दशमी’ची कथा रहस्याच्या अनेक स्तरांनी विणलेली आहे. कथानकातील धागेदोरे सहज उलगडत नाहीत. प्रत्येक टप्प्यावर नवे प्रश्न, अनपेक्षित वळणे आणि धक्कादायक खुलासे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहेत. लेखन आणि संगीत याची जबाबदारी सुरेश पंडित यांनी सांभाळली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सस्पेन्स-क्राईम थ्रिलरचा नवा मापदंड निर्माण करण्याची क्षमता असलेला ‘दशमी’ प्रत्येक चित्रपटप्रेमीने मोठ्या पडद्यावर अनुभवावा असा अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव असणार आहे. New Marathi Movie Dashami

Tags: entertainmentmarathi entertainment newsmarathi movieNew Marathi Movie DashamiRavi Prakashsouth actor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Sunday 1996 Marathi Movie
Entertainment

‘संडे १९९६’ मध्ये कोकणाच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर रहस्याचा थरार, ओंकार राऊतचा अनोखा अंदाज

ऑगस्ट 11, 2026 | 5:17 pm
 Hina khan husband
Entertainment

“तू दुस-याशी लग्न कर”, लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली ‘ही’ अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

ऑगस्ट 11, 2026 | 11:52 am
New Marathi Movie Dashami
Entertainment

अन्यायावर विजयाची गर्जना, ‘दशमी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याची ही एंट्री

ऑगस्ट 10, 2026 | 3:14 pm
Amruta Khanvilkar Legal Action on Divorce Rumours
Entertainment

“खोटी माहिती प्रसारित केल्यास…”, अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अभिनेत्री संतापली; पोस्ट शेअर करत कडक कारवाईचा इशारा

ऑगस्ट 10, 2026 | 12:54 pm
Next Post
 Hina khan husband

"तू दुस-याशी लग्न कर", लग्नाआधी हिना खानने पतीला घातलेली 'ही' अट, कॅन्सर झाल्यानंतर करणार होती प्रेमाचा त्याग

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.